Advertisement

शिल्पा शेट्टीचे फोटो काढायला गेले, पडला मार...


शिल्पा शेट्टीचे फोटो काढायला गेले, पडला मार...
SHARES

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचा फोटो काढायला गेलेल्या दोन फोटोग्राफर्सना वांद्र्यातील बॅस्टियन हॉटेलच्या बाऊन्सर्सनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हिमांशू शिंदे आणि सोनू असं या फोटोग्राफर्सचं नाव आहे. हॉटेलच्या बाऊन्सर्सनी त्यांना इतकं मारलं की दोघांचेही चेहरे रक्तानं माखले होते. दोन्ही फोटाेग्राफर्सना रुग्णालयात दाखल करण्यात अालं असून बाऊन्सर्सविरोधात खार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

कलाकारांचे फोटो काढताना फोटोग्राफर्सना मारहाण होण्याची ही पहिली घटना नाही. याप्रकरणी पोलिसांनी योग्य तपास करून बाऊन्सर्सना गजाआड करावं, अशी मागणी या जखमी फोटोग्राफर्सनी केली आहे.

कशी घडली घटना?

शिल्पा आणि राज कुंद्रा दोघेही या हॉटेलच्या बाहेर पडत होते. तेव्हा तिथं उपस्थित दोघा फोटोग्राफर्सनी त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटोसाठी शिल्पानं पोजही दिली. तितक्यात हॉटेलच्या बाऊन्सर्सनी या फोटोग्राफर्सना तिथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. वादावादीनंतर बाऊन्सर्सनी या दोघांना थेट बुक्क्यांनी मारायला सुरूवात केली.


इथं बघा कशी झाली मारहाण -


तिथं उपस्थित असलेल्या अनेकांनी १०० क्रमांकावर फोन केला. परंतु समोरून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. या दोघांचे चेहरे रक्तबंबाळ झाल्यावर अखेर तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन बाऊन्सर्सविरोधात गुन्हा दाखल करून फोटोग्राफर्सना रुग्णालयात दाखल केलं.


बॅस्टियन हॉटेलबाहेरील सुरक्षेची जबाबदारी आम्ही खासगी कंत्राटदाराकडं सोपवली आहे. या सुरक्षा रक्षकांनी फोटोजर्नलिस्टना केलेली मारहाण अत्यंत दुर्दैवी आहे. या सर्व प्रकाराबाबत आम्ही व्यवस्थापनातर्फे संबंधित पत्रकाराची माफी मागत असून त्यांच्या उपचाराचा खर्च देण्याचीही आमची तयारी आहे. त्याशिवाय आम्ही लवकरच या कंत्राटदाराकडून सुरक्षेची जबाबदारी काढून घेणार आहोत. 

- केल्व्हिन चुंग, कॉर्पोरेट शेफ अँड कन्सल्टंट, आलिया हॉस्पिटॅलिटी



हे देखील वाचा -

'वर्ल्ड फोटोग्राफी डे' विशेष : मुंबईची क्षणचित्रे टिपणारे अवलिया



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा