Advertisement

'वर्ल्ड फोटोग्राफी डे' विशेष : मुंबईची क्षणचित्रे टिपणारे अवलिया


'वर्ल्ड फोटोग्राफी डे' विशेष : मुंबईची क्षणचित्रे टिपणारे अवलिया
SHARES

क्षण चित्राला अलगद पकडून त्याचे अगणित अर्थ एकाच कॅन्व्हासवर उधळणारी 'मुक्तछंदा'ची कला म्हणजे 'फोटोग्राफी'. ही कला समजावून घ्यायला कुठल्याही शिक्षण वा भाषेची गरज नसते. सर्वसामान्यांसाठी फोटो म्हणजे एक आठवण, मनाच्या कोपऱ्यात लपलेली एक साठवण. फोटो आणि आपले नातेच वेगळे आहे. २०-२५ वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले फोटो हातात पडण्यासाठी पूर्वी १५ ते २० दिवस लागायचे. पण काळ बदलत गेला तशी फोटोग्राफीही बदलत गेली. सुरुवातीला रोलचा कॅमेरा त्यानंतर डिजिटल कॅमेरा आणि आता मोबाईल... आता एका क्लिकवर आपल्याला फोटो काढता येतो, पाहताही येतो. जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊन फोटोग्राफीच्या काही खास गोष्टी...


असा लागला फोटोग्राफीचा शोध

जोसेफ निसेफोर नियेन्स या फ्रेंच संशोधकाने फोटोग्राफीची पहिली पायरी म्हणजे हेलियोग्राफीचा शोध लावला. जोसेफ यांनी १८२७ साली जगातील पहिला फोटो काढला. 'व्यू विंडो अॅट अ ग्रास' म्हणजेच 'ल ग्लास इथल्या खिडकीतून दिसणारे दृश्य' असे नावही त्यांनी फोटोला दिले. 

१८३९ साली लुई डॅग्युर यांनी केमिकल प्लेटवर उत्तम प्रतीचे छायाचित्र बनविण्याचे तंत्र विकसित केले. १८८७ साली त्यांनी तारांचा वापर करून जगातील सर्वात पहिला जलदगती फोटोग्राफ घेतला. १९२० च्या दरम्यान ग्राहकांसाठी ब्राऊनी कॅमेरा बाजारात उपलब्ध झाला. १९६३ मध्ये आधुनिक तंत्र वापरलेला आणि सहजरित्या हाताळता येणारा कोडॅकचा कॅमेरा बाजारात आला. कोडॅकचे संशोधक स्टीव्ह सॅसोन यांनी १९७५ मध्ये ൦.१ मेगापिक्सेलचा कॅमेरा बनवला. आधी कॅमेऱ्यातल्या कॅसेटमध्ये फोटो स्टोअर होत होते. बदलत्या काळासोबत कॅसेटची जागा मेमरी कार्डने घेतली.


कसा झाला 'फोटोग्राफी डे' ?

१९ ऑगस्ट १८३९ मध्ये फ्रान्स सरकारने डॅगयुरोटाइप प्रोसेसला मान्यता दिली. त्यामुळे जगभरात १९ ऑगस्ट रोजी 'फोटोग्राफी डे' साजरा केला जातो.


कसे पडले 'फोटोग्राफी' हे नाव

१९३९ साली 'फोटोग्राफी' हे नाव अस्तित्वात आले. ग्रीक शब्द Phos या शब्दापासून 'फोटोग्राफी' हा शब्द तयार झाला आहे. Phos म्हणजे प्रकाश आणि Graphy म्हणजे लेखन रेखांकन. हे दोन शब्द एकत्र करून 'फोटोग्राफी' हा शब्द तयार झाला.


'फोटोग्राफर्स'च्या नजरेतून मुंबई   

२१ व्या शतकात तर 'फोटोग्राफी' म्हणजे व्यवसाय झालाय. काहींसाठी व्यवसाय तर काहींसाठी छंद म्हणा किंवा आवड. अशाच काही फोटोग्राफर्सची ओळख आम्ही तुम्हाला करून देणार आहोत ज्यांच्यासाठी फोटोग्राफी सर्व काही आहे. चला मग फोटोग्राफर्सच्या नजरेतून मुंबई कशी दिसते हे पाहूया.


१) नयन खानोलकर


नयन यांनी काढलेल्या बिबट्याच्या फोटोसाठी त्यांना वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड २०१७ चा दुसरा पुरस्कार मिळाला होता. आरे कॉलनीतल्या आदिवासी पाड्यात क्लिक केलेला हा फोटो आहे. याच फोटोसाठी त्यांना 'बीबीसी वाईल्डलाईफ फोटोग्राफर' हा पुरस्कारही मिळाला होता.




https://www.instagram.com/p/BLwQMFLhu9Y/" style=" color:#000; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none; word-wrap:break-word;" target="_blank">Happy to share winning image in wildlife photographer of the year awards 2016

A post shared by Nayan Khanolkar (@nayankhanolkar) on


भारतातील अनेक समस्या फोटोच्या माध्यमातून समाजापुढे मांडता येऊ शकतात. फोटोंमधून एक चांगला संदेश देता येतो. फोटो योग्यरित्या काढली नसतील, तर ती परिणामकारक ठरत नाहीत. त्यामुळे फोटोग्राफीचे तंत्रज्ञान उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.

नयन यांनी टिपलेले फोटो पाहण्यासाठी खालच्या लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/nayankhanolkar/?hl=en


२) प्रवीण तलन


प्रवीण यांनी १२ वर्षांपूर्वी 'वाईल्डलाईफ फोटोग्राफर' म्हणून फोटोग्राफीला सुरुवात केली. त्यानंतर फॅशन आणि कमर्शियल फोटोग्राफीवर लक्ष केंद्रित केले. ते स्वत:ला खूप नशीबवान समजतात. कारण 'ताज महल'च्या आता फोटो काढण्याची संधी मिळालेले ते पहिले फोटोग्राफर आहेत. मागच्या काही वर्षांपासून ते देशातील 'स्पेशल फोर्सेस' क्षण फोटोत कॅप्चर करत आहेत.




https://www.instagram.com/p/BTecdoPhw1g/" style=" color:#000; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none; word-wrap:break-word;" target="_blank">A salute to our brave jawans BSF -Border Security Force *India' s first line of #defense #soldier #border #bsf #cinematic #pravintalan #actionphotography #commandos #NationFirst #BorderSecurityForce #respect #pride #IncredibleIndianForces #l4l #likeforlike #picoftheday #trainingday

A post shared by pravin talan (@pravintalan) on



फोटोग्राफरने नेहमी अशा गोष्टी टिपल्या पाहिजेत की ज्या लोकांना माहित नाहीत. तुमच्या फोटोंमधून स्टोरी कळली पाहिजे. मी आतापर्यंत खूप प्रवास केला आहे. त्यामुळे मला वाटते की मुंबई पोलीस सर्वोत्तम आहेत. मला त्यांचे खूप कौतुक आहे. त्यामुळे मी त्यांचे फोटो काढायला करायला सुरुवात केली. गेल्या वर्षीपासून मी मुंबई पोलिसांचे कॅलेंडर प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. यंदाचे माझे हे दुसरे वर्ष आहे. हळूहळू मी 'एनएसजी' आणि 'सीआरपीएफ' यांचे फोटो काढायला सुरुवात केली आहे. 

प्रवीण यांनी टिपलेले फोटो पाहण्यासाठी खालच्या लिंकवर क्लिक करा

https://www.instagram.com/pravintalan/?hl=en


३) प्रथम गोखले



प्रथम फोटो जर्नलिस्ट असून हिंदुस्तान टाइम्ससोबत तो सध्या काम करत आहे. वांद्र्यातल्या 'दामू नगर' मध्ये लागलेली जीवघेणी आग प्रथमने फोटोतून टिपली होती. त्यासाठी त्याला 'मुंबई मुव्हमेंट २०१७ कॅलेंडर' हा पुरस्कार मिळाला होता. प्रथमला स्ट्रीट फोटोग्राफी करायला आवडते.




https://www.instagram.com/p/-_yR60ECyZ/" style=" color:#000; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none; word-wrap:break-word;" target="_blank">A man stands on roof of shanty during fire in Damu Nagar slum colony at Kandivali in Mumbai, India, on Monday, December 7, 2015. Over a thousand houses got gutted in the blaze. (Photo by Pratham Gokhale/ Hindustan Times) #hindustan_times #prathamgokhale #news #fire #smoke #disaster #instagram #indiagram #instaphotos #photojournalism #dailylife #everydaymumbai #everydayindia #everydayasia #everydayeverywhere #indiaphotos #indiapictures #indianstories #_soi #indiapictures #storiesofindia #instawithht #mumbai #india #asia

A post shared by Pratham Vijay Gokhale (@pratham.gokhale) on


मी एचएसीमध्ये असल्यापासून फोटोग्राफीला सुरुवात केली.माझ्या बाबांच्या Pentax K 1000 कॅमेऱ्यातून मी फोटोग्राफी करायला सुरुवात केली.मी जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स इथून फोटोग्राफिचा कोर्स केला आहे.२००८ पासून मी व्यावसायिक फोटोग्री सुरू केली.


४ ) अनुश्री फडणवीस



रेल्वे ही मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाते. दररोज असंख्य प्रवासी या लाईफलाईनने प्रवास करत तिचं महत्त्व अधोरेखित करतात. पण अनुश्रीने 'मुंबई लोकल'ची क्षणचित्रे ज्या खुबीने टिपली आहेत, तशी क्वचितच कुणी टिपली असतील. अनुश्री पेशाने फोटो जर्नलिस्ट आहे. ट्रेनने प्रवास करताना ती अत्यंत सहजपणे फोटो काढून मुंबईकरांचे स्वभावगुण इन्स्टाग्रामवरील तिच्या ‘ट्रेन डायरीज’द्वारे दाखवते.



https://www.instagram.com/p/BUAGEvpgdLu/" style=" color:#000; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none; word-wrap:break-word;" target="_blank">Kinjal , a transgender , poses for a picture in the ladies compartment of the Mumbai local train. I happen to know Kinjal from a social gathering I had attended with my trans friends and she recognised me. We had a lovely conversation in which I told her that I loved her gajra ( flower garland ) and her half saree ( the south indians wear this as their traditional wear) . #traindiaries

A post shared by Anushree Fadnavis (@anushree_fadnavis) on


मी हे ठरवून केलेलं नाही. माझ्या रोजच्या आयुष्यात खासकरून ट्रेनमधून प्रवास करताना मला फोटो काढायचे होते. त्यानुसार मी माझ्या सेल फोनने फोटो काढत गेले. अर्थात इतरांप्रमाणं केवळ काढायचं म्हणून नाही. हे फोटो काढताना मला या शहराची न दुसरी बाजूही उलगडत गेली.


५ ) केदारनाथ मगनूर



प्रवास करणं आणि फोटो काढणं हे कदारनाथला सर्वार्थानं आवडतं. २०१३ पासून त्यानं फोटो काढायला सुरूवात केली आणि त्यानंतर तो फोटोग्राफीच्या अक्षरश: प्रेमातच पडला. मुंबई हे त्याचं फोटो काढण्याचं आवडीचं शहर.



जेव्हा मी मुंबईला भेट देतो, तेव्हा एअरपोर्ट, बीच, प्रेक्षणीय स्थळी नक्की जातो. माझ्या लेन्सनी टिपण्यासारखं या शहरात भरपूर काही असल्याचं मला क्षणोक्षणी वाटतं.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा