Advertisement

'हंटर' फेम 'गुलशन देवय्या' आता मराठीत मांडणार डाव


'हंटर' फेम 'गुलशन देवय्या' आता मराठीत मांडणार डाव
SHARES

मुंबई - मराठी चित्रपटांची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक हिंदी कलाकार या मायमराठीत नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे, रसिकांनी देखील त्याला लगेच आपलेसे केले आहे. त्यामुळे बॉलिवूडकरांचा मराठी चित्रपटाकडे कल वाढला आहे.

हिंदीत नाव आणि प्रसिद्धी मिळवलेल्या गुलशन देवय्या हा अभिनेता लवकरच 'डाव' या मराठी चित्रपटातून झळकणार आहे. गुलशनले रामलीला, शैतान, तसेच हंटर या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली.

गुलशन हा मूळचा बंगळुरूचा. या सिनेमासाठी त्याने महिनाभर मराठीचे धडे गिरवलेत. 'यापूर्वी हंटर या सिनेमात मराठीमध्ये काही एक-दोन वाक्य बोललो असेल, असं गुलशन म्हणाला. पण त्यामुळे आपल्याला मराठी बोलता येते असं नव्हे. मात्र, आगामी 'डाव' या मराठी सिनेमासाठी अस्सलखीत मराठी बोलणे गरजेचे होते, शिवाय या सिनेमाची कथा खूप आवडली होती, त्यामुळे भाषेच्या समस्येमुळे चित्रपट नाकारण्याची रिस्क घेतली नाही, त्यापेक्षा महिनाभर मराठीचे प्रशिक्षण घेणे योग्य वाटल्याचंही त्यांने सांगितलं. मुंबईतील मराठी वातावरणात आपण राहिलो असल्यामुळे, ही भाषा अवगत होण्यास जास्त वेळ लागला नाही. आता चांगल्याप्रकारे मराठी बोलू शकतो' असंही गुलशन म्हणाला.

आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक दर्जेदार सिनेमाची निर्मिती करणाऱ्या ऑडबॉल मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'डाव' हा पहिलाच मराठी सिनेमा असून कनिश्क वर्मा यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय हिंदी आणि मराठी अशा द्विभाषेमध्ये हा सिनेमा चित्रित झाला आहे, टॉनी डिसुजा, नितीन उपाध्याय आणि अमूल मोहन या सिनेमाचे निर्माते आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा