सिद्धार्थचा नवा फॉर्म्युला, 'बी रिस्की, बी जंटलमन'!

 Mumbai
सिद्धार्थचा नवा फॉर्म्युला, 'बी रिस्की, बी जंटलमन'!
Mumbai  -  

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका असणारा 'ए जंटलमन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिद्धार्थनं त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर टित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.


'एक विलन' आणि ब्रदर्स चित्रपटानंतर सिद्धार्थ पुन्हा अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात सिद्धार्थची दुहेरी भूमिका असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. सर्वसामान्य आयुष्यात ऑफिस आणि घर या चौकटीत जगणारा गौरव. तर दुसरीकडे 'बी रिस्की बी जंटलमन' असा फॉर्म्युला असणारा ऋषी. गौरव आणि ऋषी हे एकच आहेत की दोघं वेगवेगळे आहेत, यावरुन निर्माण होणारा संभ्रम आणि विनोद हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि जॅकलिन फर्नांडिस यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. शिवाय सुनील शेट्टी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. सुप्रिया पिळगावकरही यात भूमिका साकारताना दिसणार आहे. फॉक्स स्टार स्टुडिओकडून या चित्रपटाची निर्मिती केली असून २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments