'क्विन'सोबत काम करण्यास 'किंग'चा नकार


SHARE

मुंबई - कंगना रनावत जरी बॉलीवूडची क्विन असली तरी सध्या तिच्यासोबत काम करायला टॉपचे कलाकार तयार नाहीत. यासाठी तिचा फटकळ स्वभावच कारणीभूत आहे. कारण करण जोहरच्या कॉफी विथ करन या शोमध्ये कंगनाला कोणत्या खानसोबत काम करायला आवडेल? हा प्रश्न विचारण्यात आला होता. कोणत्याच खानसोबत काम करायला आवडणार नाही असे त्यावेळी कंगनाने उत्तर दिले. तिचे हे स्पष्ट उत्तर मात्र किंग खान शाहरुख खानच्या पचनी पडले नाही. संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान याने कंगनासोबत काम करण्यास नकार दिला आहे.

दुसरीकडे 'रंगून' चित्रपटाच्या शूट दरम्यान शाहीद आणि कंगनात काही तरी बिनसल्याचेही समोर आले आहे. कंगना शाहीदला चित्रपटातील तिसरा हिरो असल्याचे मानत होती. हेच शाहीदच्या नाराजीचे कारण असल्याची चर्चा आहे. संजय दत्त आणि अजय देवगन तर आधीपासूनच तिच्यापासून चार हात लांब राहतात. उरले रणबीर सिंग आणि रणबीर कपूर. हे दोघेही दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत.

तसे इंडस्ट्रीत कंगनाचे मित्र-मैत्रीण बोटांवर मोजण्याइतकेच आहेत. त्यात कंगनाचे सर्वांसोबत उडालेले खटके. त्यामुळे इंडस्ट्रीत आता ती एकटी पडली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या