• बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या 'या' ट्विट्सची चर्चा!
  • बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या 'या' ट्विट्सची चर्चा!
  • बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या 'या' ट्विट्सची चर्चा!
  • बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या 'या' ट्विट्सची चर्चा!
  • बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या 'या' ट्विट्सची चर्चा!
  • बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या 'या' ट्विट्सची चर्चा!
  • बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या 'या' ट्विट्सची चर्चा!
SHARE

सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय सुरु आहे याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना कायम लागलेली असते. मात्र आपल्या आयुष्यातल्या अनेक बाबी, तसेच अनेक सामाजिक, राजकीय किंवा वैचारिक चर्चांविषयी हे सेलिब्रिटी सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. या सेलिब्रिटींचा हा स्पेशल ट्विटर टॉक!


परेश रावलला देव पावल?जवळपास दोन दशकांनंतर एकत्र काम करणाऱ्या ऋषी कपूर आणि परेश रावल यांच्या 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटासाठी हे दोघेही भलतेच उत्सुक आहेत. अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या ट्विटरवर या सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.


तर सिनेमाची अभिनेत्री पायल घोषनं सिनेमाचा टीजर ट्विट केला आहे...


जॅकलिनचा आवडता जंटलमेन!

जॅकलिन फर्नांडेसच्या आगामी 'ए जंटलमेन' सिनेमाचं बंदूक मेरी लैला हे गाणं सोशल मीडियावर भलतंच फेमस झालंय. त्यामुळे हे गाणं तयार कसं झालं याचा व्हिडिओ जॅकलिननं ट्विट केला आहे.
वरुणची 'जुडवा'स्टाईल कबड्डी!


अभिनेता वरुण धवन त्याच्या 'जुडवा 2' साठी जोरदार तयारी करतोय. सिनेमाचा टीजर ट्विटरवर सर्वात आधी त्यानेच पोस्ट केला. पण त्यावर प्रो कबड्डी स्टाईलमध्ये सिनेमाचं प्रमोशन करणारा व्हिडिओ त्याने पोस्ट केला आहे. आणि तो टीजरइतकाच धमाल आहे!
सलमान आला घाईवर!


पहिल्या 'जुडवा' सिनेमामध्ये अभिनेता सलमान खानने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे सलमान हा सिनेमा पहाण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक आहे.
क्रिती सेननमुळे टायगर श्रॉफ डिस्टर्ब!


आयुषमान खुराना आणि क्रिती सेनन यांच्या 'बरेली की बर्फी' सिनेमाने फक्त बरेलीमध्येच नाही तर देशभरातल्या त्यांच्या चाहत्यांमध्ये धमाल उडवून दिली आहे. या 'बरेली की बर्फी'चा बॉलिवूडमधला हा चाहता तर तिला पाहून इतका डिस्टर्ब झालाय की त्याला मार्शल आर्ट्सचं ट्रेनिंगच करता येत नाहीये!
इलियाना डिक्रुजचं काऊंटडाऊन!


तर अभिनेत्री इलियाना डिक्रुजला तिचा 'बादशाहो' कधी एकदा रिलीज होतोय असं झालंय. त्यामुळे सिनेमाचे पोस्टर ट्विट करुन ती प्रत्येक दिवसाचं काऊंटडाऊन देतेय.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
ताज्या बातम्या