Advertisement

'तरीही शेषप्रश्न' पुस्तकाचे प्रकाशन


'तरीही शेषप्रश्न' पुस्तकाचे प्रकाशन
SHARES

दादर- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दादरच्या अमर हिंद क्रीडा मंडळाच्या सभागृहात ग्रंथालीच्या वतीने बुधवारी सायंकाळी लेखिका छाया दातार लिखित 'तरीही शेषप्रश्न' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक लेखक कवी कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. या पुस्तकाचे प्रकाशन विद्या बाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याच वेळी ग्रंथालीच्या शब्द रुची या महिला विशेष अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.

छाया दातार यांच्या या पुस्तकाची प्रस्तावना जयश्री गोडसे यांनी वाचली. यावेळी लेखिका छाया दातार यांनी 8 मार्च आपण महिला दिन म्हणून का साजरा करतो? याचे महत्व काय? हे सांगितले. कुणासाठी हा दिवस साजरा करायचा आणि का यावर देखील त्यांनी भाष्य केले. दातार यावेळी म्हणाल्या की, "निवृत्तीनंतर मी काहीतरी लिखाण करावे अशी अनेकांची इच्छा होती.1 जानेवारी 2013 ला मैत्रिणीने सल्ला दिला आणि या पुस्तकाचे लेखन करायचे मनावर घेतले". लालित्यपूर्ण लिखाण ही माझी लेखनाची शैली आणि आवड आहे असंही त्या म्हणाल्या. या पुस्तकाच्या लेखनाच्या वेळी शेवटच्या टप्यात अनेक महिला लेखकांनी लेखनासाठी मदत केल्याचे आवर्जून सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच मी चळवळीशी संलग्न असल्यामुळे त्याचे संदर्भ या पुस्तकात आले आहेत. काही कथा किस्से यांचाही संदर्भ असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी लेखिका दातार यांच्या पुस्तकाची माहिती देत दातार यांचे चित्रकार संजीव खांडेकर आणि विद्या बाळ यांनी कौतुक केले. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा