वेब सिरिजची तरूणाईत क्रेझ

  Pali Hill
  वेब सिरिजची तरूणाईत क्रेझ
  मुंबई  -  

  मुंबई - सध्या तरुणाईत वेब सिरिजची चांगलीच क्रेझ दिसते आहे. वेब सिरिज जेवढी एंटरटेनिंग असेल, तेवढे जास्त व्ह्यू मिळतात. अशीच एक वेब सिरिज घेऊन भुवन बाम आपल्या भेटीला येतोय. सब ग्रुपचं डिजिटल चॅनेल ‘हॅपी-फाय’वर ही सिरिज आपल्याला लवकरच पाहायला मिळणाराय.

  'ब्रो-कोर्ट'चा प्रमुख चेहरा असेल तो भुवन बाम अर्थात ‘ब्रो’... भुवनच्या आधीच्या काही वेब सिरिजला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. सामाजिक विषयांना महत्त्व दिल्यानं त्याची लोकप्रियता तरुणाईमध्ये अधिक आहे. ‘बीबी’ की वाईन्स या भुवनच्या सिरिजला 10 लाख 40 हजार सबस्क्रायबर तर, 20 लाख व्ह्यू आहेत. दिग्दर्शन अश्विन शेट्टी यानं केलंय. यापूर्वी अश्विननं देर अंधेर तसंच टाटा स्काय, फोर्ट फिगो अॅस्पायर, पार्क ऍव्हेन्यू यांसारख्या नामांकित कंपन्यांसाठी जाहिरातीही केल्या आहेत. ही सिरिज म्हणजे एक एंटरटेनिंग ड्रामा असेल. ही सिरियल ‘ब्रो-कोड’ अर्थात कायद्यांचा जाहीरनामा ज्यामध्ये हॉस्टेल लाइफमधल्या हॅपनिंग्स, शिवाय ‘ब्रो’चं वागणं याविषयी भाष्य करणारी आहे. जो कोणी ‘ब्रो-कोड’चे कायदे मोडेल, त्याला ‘ब्रो-कोर्ट’मध्ये हजर केलं जाईल.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.