• ब्रुहाहाची दमदार सुरूवात
SHARE

चर्चगेट - सिडनॅहम महाविद्यालयाच्या ब्रुहाहा या वार्षिक महोत्सवाला शुक्रवारपासून सुरूवात झालीय. फाईन आर्ट, परफॉर्मिंग आर्ट, स्पोर्ट्स इव्हेंट, लिट्ररी आर्टस्, गेमिंग झोन अशा 5 विभागांतर्गत या महोत्सवात विविध इव्हेंट रंगणार आहेत. हा महोत्सव सिडनॅहम महाविद्यालयात 9 ते 10 डिसेंबर आणि 14 ते 16 दरम्यान रंगणार आहे. 9 आणि 10 तारखेला प्राथमिक फेरी रंगणार आहे. या फेस्टीव्हलच्या पहिल्या दिवशी हॉली बॉल, फूटबॉल, कॅरम, निऑन डॉड्ज बॉल असे एकाहून एक सरस विविध इव्हेंट पाहायला मिळाले. प्राथमिकमधून जे योग्य असतील त्यांना अंतिम फेरीत सादरीकरण करण्यास मिळणार आहे. या महोत्सवाची अंतिम फेरी 14 ते 16 दरम्यान सिडनॅहम महाविद्यालयात रंगेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या