वांद्रे - उपनगरातील सर्व केबल आॅपरेटर्सने सोमवारी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी आॅपरेटर्सनी अप्पर जिल्हा अधिकारी कुमार खैरे यांची भेट घेउन त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. यावर खैरे यांनी योग्य तोडगा काढण्याचे अश्वासन केबल आॅपरेटर्सना दिले.
मार्च महिना संपत आला असताना देखील अनेक केबल आॅपरेटर्सनी मनोरंजन कर जमा केलेला नाही. परिणामी जिल्हाधिकारी कार्यालयाने केबल कंपन्यांना आॅपरेटर्सचे कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले. केबल चालकांचा व्यवसाय सध्या तोट्यात असल्याने केबल चालकांना थोडी मुदत देण्यात यावी अशी मागणी केबल आॅपरेटर्सने केली होती. मात्र अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने केबल आॅपरेटर्सने हा मोर्चा काढला.