जस्टिन बीबर भारतात सेटल व्हायला येतोय?

 Navi Mumbai
जस्टिन बीबर भारतात सेटल व्हायला येतोय?

लोकप्रिय पॉपस्टार जस्टिन बीबर हा पुढच्या आठवड्यात भारतात येणार आहे. यावेळी त्याच्या जादुई स्वरांचा आस्वाद नवी मुंबईकरांना घेता येणार आहे. पण या कॉन्सर्टसाठी तो आपल्यासोबत कोणकोणत्या वस्तू आणणार आहे हे कळल्यावर तुम्हीही चक्राऊन जाल. ही यादी बघितली तर जस्टीन भारतात परफॉर्म करण्यासाठी येतोय की सेटल होण्यासाठी हाच प्रश्न पडावा! जस्टीन बीबर नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये 10 मे रोजी परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी यावेळी अनेक बॉलिवूड स्टार्स देखील हजेरी लावणार आहेत. बीबरच्या या कॉन्सर्टचे आयोजन व्हाईट फॉक्स इंडिया नावाची कंपनी करत आहे.  

जस्टिन 120 लोकांच्या ग्रुपसह मुंबईत येणार आहे. जस्टिन येताना कॉन्सर्टसाठी लागणाऱ्या पिंग प्ले स्टेशन, पाँग टेबल, कपाट, सोफा सेट, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, मसाज टेबल अशा अनेक वस्तू घेऊन येणार आहे. तो मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये थांबणार आहे. यावेळी आपलं सामान ठेवण्यासाठी आणि ने-आण करण्यासाठी जस्टिनने आयोजकांकडे 10 कंटेनरची मागणी केली आहे. तसेच त्याची आणखी एक अट आहे, की आपण परफॉर्म करण्यासाठी हॉटेलहून स्टेडियमला निघताना हेलिकॉप्टरनेच जाणार. त्यामुळे आता जस्टीनच्या या मागण्या आणि अटी पूर्ण करता करता आयोजकांच्या नाकी नऊ येणार हे मात्र नक्की!

Loading Comments