Advertisement

२൦१७ मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या घरी हलला पाळणा

2017 या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले!

२൦१७ मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या घरी हलला पाळणा
SHARES

आई-बाबा होणं म्हणजे एक वरदानच! आई-बाबा होण्याहून अधिक दुसरा कुठला आनंद नसेल. कुणीतरी आपल्याला आई-बाबा या नावानं हाक मारणं याहून अधिक आनंदाचा क्षण कुठलाच नाही. हाच आनंद अनुभवण्याचा क्षण 2017 मध्ये बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटी कपल्सच्या आयुष्यात आला. या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींच्या घरी चिमुकल्यांचे आगमन झाले. एक नजर टाकूया अशाच काही सेलिब्रिटींवर...


सोहा अली खान - कुणाल खेमू

सोहा अली खाननं 29 सप्टेंबरला एका परीला जन्म दिला. कुणाल खेमूनं ट्वीटर अकाऊंटवरून ही आनंदाची बातमी दिली. दोघांनी आपल्या मुलीचं नाव इनाया नौमी ठेवलं आहे. एप्रिल महिन्यात सोहाचा बेबी बम्प दिसायला लागला होता. त्यानंतर कुणालनं ट्वीटरवरून सोहा प्रेगनंट असल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता.



अनेक वर्ष डेट केल्यानंतर सोहा आणि कुणाल 25 जानेवारी 2015 रोजी विवाहबंधनात अडकले.


ईशा देओल - भरत तख्तानी

हेमा मालिनी यांची कन्या ईशा देओल यावर्षी ऑक्टोबर महिन्यात आई झाली. तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. ईशा आणि भरतनं मुलीचं नाव राध्या ठेवलं आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात इशानं गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. ईशानं आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत प्रेग्नेंसीचा काळ चांगलाच एन्जॉय केला. याचे बरेच फोटो ईशानं सोशल मीडियावर शेअर केले होते.



अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ईशानं २൦१२ मध्ये भरत तख्तानीसोबत लग्न केले होते. लग्नानंतरही ईशानं काही चित्रपटात काम केले होते. पण २൦१५ पासून ती रुपेरी पडद्यापासून लांब राहिली.


लीसा हेडन –डिनो लालवानी

लीसा हेडननं 17 मेला लंडनमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला. लीसानं पती डिनो लालवानी आणि आपल्या मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत ही गोड बातमी दिली होती. लीसानं आपल्या मुलाचं नाव जॅक ठेवलं आहे.



A post shared by Lisa Haydon (@lisahaydon) on


एक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऑक्टोबर 2016 साली दोघांनी लग्न केलं. डिनो हा उद्योगपती गुल्लु लालवानी यांचा मुलगा आहे.


दीपिका सिंह – रोहित राज

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंहनं 20 मेला एका मुलाला जन्म दिला. दोघांनी मुलाचं नाव सोहम ठेवलं आहे.



दीपिकानं 2 मे 2014 रोजी 'दिया और बाती हम' या शोचा दिग्दर्शक रोहित राज गोयल याच्यासोबत लग्न केलं. 'दिया और बाती' शोच्या सेटवर दोघांची भेट झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दीपिकाच्या कुटुंबीयांनी दिग्दर्शक रोहित राज गोयलला तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नात पाहिले होते. कुटुंबीयांनी तिथेच त्याला पसंत केले होते. रोहितच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.


दिव्या गुप्ता – किन्शुक महाजन

टीव्ही सेलिब्रिटी किन्शुक महाजनच्या घरी देखील दोन चिमुकल्यांचं आगमन झालं. 7 ऑक्टोबरला दिव्या गुप्तानं एक मुलगी आणि एक मुलगा अशा दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. शाहीर आणि सायशा अशी चिमुकल्यांची नावं आहेत.



फरदीन खान - नताशा वाढवानी

फरदीन खान दुसऱ्यांदा पिता झाला आहे. 11 ऑगस्टला त्याची पत्नी नताशानं लंडनमध्ये एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. फरदीननं आपल्या मुलाचं नाव अझरिउस ठेवलं आहे. ट्वीटरवरून फरदीननं त्याच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती.



फरदीन आणि नताशाला तीन वर्षांची मुलगी देखील आहे. तिचे नाव डियानी इसाबेल खान आहे. फरदीननं अभिनेत्री मुमताज यांची कन्या नताशा हिच्यासोबत 2005 साली लग्न केलं होतं.


अदनाम सामी – रोया शमी खान

अदनाम सामीच्या घरी एका छोट्या परीचं आगमन झालं आहे. त्याची पत्नी रोया शमी खाननं 9 मेला एका मुलीला जन्म दिला. दोघांनी मुलीचं नाव मेदीना असं ठेवलं आहे.




प्रियंका वोहरा- रणविजय सिंह

अभिनेता आणि टीव्ही होस्ट रणविजय सिंहच्या घरी देखील लक्ष्मीनं जन्म घेतला आहे. त्याची पत्नी प्रियंका वोहरानं 16 जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी मुलीचं नाव कायनात ठेवलं आहे.




हेही वाचा

मराठी कलाकारांसाठी २०१७ ठरलं 'लग्नपर्वणी'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा