Advertisement

'दीपिकाचं नाक कापू देणार नाही', पद्मावतीला रामदास आठवलेंची साथ


'दीपिकाचं नाक कापू देणार नाही', पद्मावतीला रामदास आठवलेंची साथ
SHARES

'दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा ‘पद्मावती’वर बंदी आणावी', अशी मागणी भाजपा आमदारांकडून होत असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र संजय लीला भन्साळी आणि या सिनेमाचं सर्मथन केलं आहे. याचसोबत 'चित्रपटातल्या काही गोष्टी वगळल्या तर सिनेमा चांगला आहे', अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.


दीपिकाचे नाक कापू देणार नाही

'पद्मावती'चे प्रदर्शन कुणीही रोखू शकत नाही', असे वक्तव्य करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्यावर हल्ला करण्याची धमकी करणी सेनेनं दिली आहे. 'आम्हाला डिवचण्याचे उद्योग बंद न केल्यास दीपिका पादुकोणचं नाक कापून टाकू', अशी धमकी करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्रनाथ यांनी दिली होती. त्यावर रामदास आठवले यांनी 'आम्ही दीपिका पदुकोण हिचे नाक कापू देणार नाही. ती एक अभिनेत्री आहे. ती तिचे काम करत आहे', अशी प्रतिक्रिया दिली.हेही वाचा

'पद्मावती' प्रदर्शित होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही - दीपिका पादुकोण

 अखेर ‘पद्मावती’ची रिलीज डेट पुढे ढकलली


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा