Advertisement

अखेर ‘पद्मावती’ची रिलीज डेट पुढे ढकलली


अखेर ‘पद्मावती’ची रिलीज डेट पुढे ढकलली
SHARES

वादाच्या वावटळीत सापडलेल्या पद्मावती सिनेमाच्या रिलीजला केवळ १० दिवस शिल्लक असताना सिनेमाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. मात्र हा सिनेमा कधी रिलीज होईल, हे निर्मात्यांनी स्पष्ट केलेलं नाही. १ डिसेंबरला पद्मावती सिनेमा प्रदर्शित होणार होता.


वादाची पार्श्वभूमी

दिग्दर्शक संजय लिला भन्साली यांच्या महत्त्वाकांक्षी कलाकृतीला मागील काही दिवसांपासून राजपूत संघटनांकडून विरोध होत आहे. एवढंच नव्हे, तर राजपूतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेना नावाच्या संघटनेनं या सिनेमात राणी पद्मावतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचं नाक कापण्याची आणि भन्साली यांना जोडे मारण्याची उघड धमकीही दिली होती.


नाराज सेन्साॅर बोर्ड

त्यापाठोपाठ केंद्रीय सेन्सॅर बोर्डाने (सीबीएफसी) ही तांत्रिक बदलांची कारणे देत हा सिनेमा निर्मात्यांकडे परत पाठवला होता. 'सीबीएफसी'ने या सिनेमाला अद्याप रिलीज सर्टिफिकेट दिलेलं नाही. त्यातच या सिनेमाचं मीडिया स्क्रीनिंग केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज होते. या सर्व पार्श्वभूमीवर सिनेमाच्या निर्मात्यांनी अखेर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याचं म्हटलं जात आहे.


काय म्हटलं निर्मात्यांनी?

या सिनेमाचे निर्माते व्हायकॉम १८ ने आपण स्व इच्छेने सिनेमाचं रिलीज पुढे ढकलत असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात केला आहे. आम्ही कायद्याचं पालन करणारे जबाबदार नागरिक आहोत. राजपूतांची परंपरा आणि सन्मान यांचं चित्रण पद्मावतीमध्ये केलं आहे. सिनेमातील कहाणीने प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरुन येईल. 'सीबीएफसी'बद्दल आपल्याला आदर असून लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल आणि रिलीज डेट आम्ही जाहीर करू, अशी आशाही व्हायकॉम १८ ने व्यक्त केली आहे.

या ऐतिहासिक कथानकावर आधारीत सिनेमात दीपिका पदुकोणने राणी पद्मावती, शाहिद कपूरने महारावल रतन सिंह आणि रणवीर सिंहने अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा