Advertisement

'चैत्र चाहूल' २०१८ चं पुरस्कार जाहीर


'चैत्र चाहूल' २०१८ चं पुरस्कार जाहीर
SHARES

'चैत्र चाहूल'तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान या दोन्ही पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदा रंगकर्मी सन्मान २०१८ या पुरस्कारासाठी लेखक दत्ता पाटील आणि ध्यास सन्मान २०१८ या पुरस्कारासाठी अविनाश गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. चैत्र चाहूलतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या या विशेष पुरस्काराचे यंदाचं हे १३ वं वर्ष आहे.


दत्ता पाटील यांना लाभलेले पुरस्कार

दत्ता पाटील या लेखकाच्या 'सेलिब्रेशन' या पहिल्याच एकांकिकेला प्रतिष्ठेचा पुरुषोत्तम करंडक पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर कृष्णविवर, मध्यमपदलोपी यांसारख्या दीर्घांकाला तसेच ब्लॅक आऊट, सयामी, सिटीलाईट या एकांकिकांना प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. नुकतेच त्यांचे गाजलेले नाटक 'हंडाभर चांदण्या' या नाटकास मुंबई व्यावसायिक नाट्यनिर्मात्या संघाच्या दीर्घांक स्पर्धेत १ लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक मिळाले.


अविनाश गोडबोलेंविषयी

अविनाश गोडबोले यांनी १९६६ मध्ये डॉ. जे. जे स्कूल ऑफ आर्टस येथून पदवी संपादन केली. देशभरातील मोठमोठ्या प्रतिष्ठीत संस्थांमधून क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम केलं. त्यांना १९९९ मध्ये कमर्शियल आर्टिस्ट म्हणून गिल्ड (कॅग) या संस्थेनं ‘हॉल ऑफ फेम’ या प्रतिष्ठित पुरस्काराने भूषवण्यात आलं होतं. १९७७ पासून त्यांच्या चित्रकृती नियमितपणे मुंबईतील अनेक कलादालन, गॅलरी, प्रदर्शनांमधून पहायला मिळतात.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अंबरीश मिश्र यांच्या हस्ते खासदार विनय सहस्त्रबुद्धे (अध्यक्ष - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद) (आय.सी. सी. आर.) यांना सन्मानित करण्यात येईल आहे. याचसोबत संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर हे देखील उपस्थित राहतील.

या पुरस्कार सोहळ्याचे वितरण रविवार १८ मार्च, २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रविंद्र नाट्यमंदिर येथे होणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा