Advertisement

सागरिका आणि झहीर लग्नबेडीत अडकले!


सागरिका आणि झहीर लग्नबेडीत अडकले!
SHARES

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटर झहीर खान यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सगळ्यांना समजल्यापासून त्यांचं लग्न कधी होणार याचीच सगळे वाट पाहत होते. आणि फायनली गुरुवारी सकाळी या दोघांचा नोंदणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. झहीरच्या ‘प्रोस्पोर्ट फिटनेस स्टुडिओ’ची व्यवसाय प्रमुख अंजना शर्माने काही तासांपूर्वीच झहीर-सागरिकाचा लग्नानंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे!

 

 

 And its done...my last partner in crime...@zaheer_khan34 @sagarikaghatge ...let the party begin

A post shared by Anjana Sharma (@anjiestylediva) on

">


And its done...my last partner in crime...@zaheer_khan34 @sagarikaghatge ...let the party begin

A post shared by Anjana Sharma (@anjiestylediva) on


२७ नोव्हेंबर म्हणजेच येत्या सोमवारी मुंबईतील ताज महाल पॅलेस अॅण्ड टॉवर येथे त्यांचा पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा आणि रिसेप्शन पार पडणार आहे. सागरिका ने 'चक दे इंडिया' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये सुरुवात केली होती. त्यानंतर तिने 'फॉक्स', 'मिले ना मिले हम', 'रश' या सिनेमांमध्येही काम केलं. 'एका प्रेमाची गोष्ट' या मराठी सिनेमात काम करून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. झहीर खान आणि सागरिका घटके यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चेनंतर त्यांच्या फॅन्सना दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. आता ती प्रतिक्षा संपली आहे.


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा