सनी पवारने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

 Bandra East
सनी पवारने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

वांद्रे - लायन चित्रपटात लहान मुलाची भूमिका साकारणारा मुंबईकर सनी पवार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या आठ वर्षांच्या चिमुकल्याची जादू अमेरिकेतल्या ऑस्कर अवॉर्डमध्येही पाहायला मिळाली. या अवॉर्ड कार्यक्रमातून परत येताच सनी आणि त्याच्या वडिलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या वेळी सनीने उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांना पेढा भरवून त्यांचे तोंड गोड केले. उद्धव ठाकरे यांनीही सनीचे कौतुक केले.


Loading Comments