Advertisement

सीआयडी टीव्ही शोमधील फ्रेडीची एक्झिट; दीर्घ आजाराने निधन

सीआयडी शो मधील प्रसिद्ध चेहरा म्हणून दिनेश फडणीस यांची ओळख.

सीआयडी टीव्ही शोमधील फ्रेडीची एक्झिट; दीर्घ आजाराने निधन
SHARES

सोनी टीव्हीच्या लोकप्रिय क्राईम शो 'सीआयडी'मध्ये CID ऑफिसर फ्रेडरिक्सची प्रसिद्ध व्यक्तिरेखा साकारणारे दिनेश फडणीस यांनी सोमवारी रात्री 12.08 वाजता कांदिवलीच्या तुंगा हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

57 वर्षीय दिनेश फडणीस यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने निधन झाले.

https://twitter.com/ParagShahBJP/status/1731923054593273932?t=VxtD9HbbmsW90rSrfLXY3Q&s=19

सीआयडीमध्ये दया ही व्यक्तिरेखा साकारणारे आणि दिनेश फडणीस यांचे अत्यंत जवळचे मित्र असलेले दयानंद शेट्टी यांनी एका न्यूज चॅनलला सांगितले की, दिनेशला यकृत, हृदय आणि किडनीचा त्रास होता आणि त्याची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढतच गेली.

दिनेश फडणीस हे 30 नोव्हेंबरपासून कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात दाखल होते.

बोरिवली येथील दौलत नगर स्मशानभूमीत दिनेश फडणीस यांच्या पार्थिवावर लवकरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टीव्ही शोशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केले.

दिनेश फडणीस 1998 मध्ये सुरू झाल्यापासून सीआयडी या शोशी जोडले गेले होते आणि सीआयडीच्या दोन दशकांच्या प्रवासात ते नेहमीच शोमध्ये दिसले.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा