झोपडपट्टीत फुटले प्रतिभेचे धुमारे

  मुंबई  -  

  कलिना - मुंबईतल्या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या मराठमोळ्या सनी पवारने अॅकॅडमी अॅवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर चालून देशवासीयांची मान उंचावली आहे. अमेरिकेच्या लॉस एंजल्समध्ये पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कारादरम्यान सनीची कुणी गळाभेट घेतली तर कुणी त्याला उचलून घेत त्याचे कोडकौतुक केले. ऑस्करसाठी नामांकित झालेल्या लायन या सिनेमात सनीने अभिनेता देव पटेल याची भूमिका साकारली आहे. मोठ्या पडद्यावर झळकण्याचं सनीचं स्वप्न अखेर पूर्ण झालं.

  कलिनातल्या कुंचीकुरवीनगर इथल्या रोड क्रमांक दोनमधल्या झोपडीत राहणाऱ्या छोट्याशा सनीला चित्रपट पाहण्याची खुपच आवड आहे. तसंच चांगले चित्रपट करून सनीने नाव कमवावे अशी कुटुंबियांची अपेक्षा आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.