Advertisement

बिग बॉसच्या घरात रंगणार “खेळ मांडला”


बिग बॉसच्या घरात रंगणार “खेळ मांडला”
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “खेळ मांडला” हे कार्य आजही रंगणार आहे. घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. काल या टास्कची सुरुवात झाली. ज्यामध्ये एक टीम लहान मुलांचं पात्र साकारत होतं, तर दुसरी टीम खेळण्यांचे पात्र रंगवत होते.

बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या लहान मुलांना त्यांच्या खेळण्यांसोबत सतत खेळून सतवायचं होतं. ज्यामध्ये मेघा आणि रेशममध्ये पुन्हा एकदा वाद रंगला. मेघाने आक्षेप घेतला की, बिग बॉसने नियम आम्हाला बोलावून सांगितले नाहीत.

या वादामध्येच आस्ताद आज बिग बॉसला अशी विनंती देखील करणार आहे की, यापुढे मेघा बरोबर टास्क देऊ नये. या कार्यामध्ये घरातील काही सदस्यांनी बच्चेकंपनी बनून दंगा घातला. हे चिल्लर पार्टी आणि त्यांचे नखरे खेळणी बनलेल्या सदस्यांना बेहाल करून सोडणार आहेत, हे नक्की. हा खेळ आज देखील रंगणार असून काल जे सदस्य खेळणी बनले होते ते आज लहान मुलं बनणार आहेत. तर जे काल खेळणी बनले होते ते आज लहान मुलं बनणार आहेत.


आज काय?

आजच्या खेळाची सुरुवात व्यवस्थित झाली असून, पुष्कर, स्मिता आणि आस्ताद यांच्यात चांगलेच भांडण होणार आहे. पुष्कर दुसऱ्या टीमवर प्रंचड चिडणार असून तो आरोप देखील करणार आहे की, जाणून बुजून ही टीम एकाच खेळण्याला थकवायचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे आस्ताद आणि पुष्करमध्ये वाद रंगणार आहे.


पुष्कर-स्मितामध्ये होणार बाचाबाची

पुष्करने स्मिता आणि टीममधील सदस्यांना वारंवार माणुसकी नसल्याचं म्हंटल्याने स्मिता पुष्करला धमकी देणार आहे की, पुन्हा असं बोललास तर ‘लाथ मारेन” ज्यावर पुष्कर आणि स्मितामध्ये बरीच बाचाबाची होणार आहे.
दुसरीकडे मेघा रेशमला कार्यामध्ये “मुकी परी” असं म्हणणार आहे कारण, रेशम मेघाशी बोलत नाही. जुई आणि स्मितामध्ये देखील टास्क करत असताना वादावादी झाल्याचं बघायला मिळणार आहे.

आता ही भांडणं कोणत्या टोकाला जातील? कोणती टीम विजयी होईल? आज बनलेले चिल्लर पार्टी आणि त्यांचे नखरे खेळणी बनलेल्या सदस्यांना किती बेहाल करून सोडणार? हे प्रेक्षकांना गुरुवारच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा