Advertisement

बिग बॉसच्या घरात रंगणार 'रंग माझा वेगळा'


बिग बॉसच्या घरात रंगणार 'रंग माझा वेगळा'
SHARES

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गुरुवारी सगळ्या सदस्यांना सरप्राईझ मिळालं कारण महाराष्ट्राची लाडकी हर्षदा खानविलकर यांची या घरामध्ये एन्ट्री झाली. यावेळी घरातल्या सर्व सदस्यांनी त्यांचं आनंदाने स्वागत केलं. त्यांची घरात एन्ट्री झाल्यानंतर बिग बॉसने त्यांना “बिंब - प्रतिबिंब” हे टास्क दिलं होतं. हा टास्क आजही म्हणजेच शुक्रवारच्या भागातही सुरू राहणार आहे. पण याचसोबत घरामध्ये 'रंग माझा वेगळा' हा कॅप्टनसीचा टास्कही रंगणार आहे.


कोण ठरणार नवीन कॅप्टन?

ज्याप्रमाणे फुलं कुठलाही भेद न बाळगता सर्वांना एकसारखा सुगंध देतात, अगदी त्याचप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टनने सर्वांना एक समान न्याय देणे, आनंद देणे अपेक्षित आहे. म्हणूनच सदस्यांमधील वेगवेगळ्या रंगाची पारख करण्यासाठी बिग बॉस सदस्यांना 'रंग माझा वेगळा' हे कॅप्टनसीचं कार्य देणार आहेत.

यामध्ये कॅप्टनसीसाठी पात्र असलेल्या दोन उमेदवारांनी आपली छानशी फुलांची बाग तयार करायची आहे. बागेमध्ये फुलं रोवून बाग सजवायची आहे. त्या उमेदवाराचे समर्थक त्यांच्यासोबतच उभे असणार आहेत. तर बाकीच्या सदस्यांना आपल्या आवडत्या उमेदवाराच्या रंगीत फुलांची बाग जपायची आहे. पुष्कर आणि सुशांत हे दोघेही कॅप्टनसीसाठी या आठवड्यामधील उमेदवार आहेत.


राजेश, सुशांतला होणार शिक्षा

या टास्कदरम्यान राजेश आणि सुशांत शक्तीचा वापर करणार आहेत, ज्याला परवानगी नाही... बिग बॉसने वारंवार सूचना देऊनही दोघांकडून या नियमाचं उल्लंघन होणार आहे. हिंसेचा वापर केल्याने बिग बॉस राजेश आणि सुशांत या दोघांनाही कठोर आणि कडक शब्दांमध्ये त्याची जाणीव करून देणार असून हे दोघेही बिग बॉसच्या शिक्षेस पात्र असणार आहेत. बिग बॉस यांनी घरातील सगळी कामं हे दोघे करणार असून त्यांना कोणीही मदत करू शकत नाही, अशी घोषणा करणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा