Advertisement

सिद्धार्थ सागरला आईच द्यायची जेवणातून ड्रग्स!


सिद्धार्थ सागरला आईच द्यायची जेवणातून ड्रग्स!
SHARES

अखेर कॉमेडियन सिद्धार्थ सागरने गेले काही दिवस त्याच्या आयुष्यात काय काय घडत होतं, याबाबत अखेर खुलासा केला आहे. गेले चार महिने सिद्धार्थ सागर गायब असल्याची बातमी एका मैत्रिणीने सोशल मीडियावरून सांगितले होते. त्यानंतर काहीच दिवसांत सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत आपण सुरक्षित असल्याचे चाहत्यांना सांगितले होते.

सिद्धार्थ म्हणाला, माझ्या आई-वडिलांचा अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. मी माझ्या आईबरोबर राहतो. पण माझ्या आईच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी एक व्यक्ती आली (सुयश गाडगीळ). हे नातं ही मी स्वीकारलं. पण काही दिवसांत माझ्या आईचं वागणं बदललं. त्या दरम्यान माझं वजन कमी होत असल्याचं मला जाणवलं. यावेळी मला बायपोलर नावाचा आजार आहे आणि त्यासाठी ती मला जेवणातून ड्रग्स देत आहे असं आईनं सांगितलं. यावेळी मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण या आजाराचे संकेत मला कधीच दिसले नव्हते. काही दिवसांत या दोघांनी मला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये टाकलं. तिथे माझ्यावर प्रचंड अत्याचार झाले. अनेकवेळा माझी शुद्ध हरपायची. त्यानंतर मी तिथून पळ काढला. घरी आलो. पण काही दिवसांत मला परत वेड्यांच्या दवाखान्यात दाखल केलं गेलं.


सिद्धार्थ पुढे म्हणाला, घरात आधीपासूनच प्रॉपर्टीवरून भांडणं सुरू होती. माझ्या आईने मला न सांगता माझे ९० ते ९५ लाख रूपये घेतले. त्यांना केवळ माझे पैसे हवे होते. माझ्याकडून पैसे मिळणं बंद झाल्यावर त्यांनी मला वेडं केलं. त्याचवेळी मी माझ्या कुटुंबाविरोधात पोलिसांमध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. अखेर माझ्या आईने 'आशा की किरण' नावाच्या संस्थेत माझ्यावर उपचार सुरू केले. नव्या सुधारगृहात माझ्यावर योग्य उपचार झाले. येत्या काळात पुन्हा नव्याने सुरूवात करत मी प्रेक्षकांसमोर येईन.



हेही वाचा

'माझ्या कुटुंबियांनीच माझा छळ केला', कॉमेडियन सिद्धार्थचा इन्स्टाग्रामवर खुलासा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा