Advertisement

महिलांवर आधारीत एकपात्री नाटक


महिलांवर आधारीत एकपात्री नाटक
SHARES

माहिम - दादर माटुंगा कला केंद्रात रविवारी सायंकाळी 6 वाजता रामनगरी या तुफान विनोदी एकपात्री नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्या धामणकर पुरस्कृत कै. वासुदेव आणि नलिनी परांजपे यांच्या स्मृतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं सादरीकरण वंदन नगरकर यांनी केले, तर लेखन राम नगरकर यांनी केले होते. रविवारची संध्याकाळ वंदन नगरकर यांच्या लयबद्ध सादरीकरणामुळे प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरली. महिलांना कामातून स्वत:साठी वेळ मिळत नाही. पुरुषांप्रमाणे त्यांनाही थोड मुक्त राहता यावं, यासाठी त्या कशा वेगवेगळ्या प्रकारे धडपड करतात, या विषयावर आधारीत या कार्यक्रमातून हास्य नाट्य सादर करत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा