षण्मुखानंदमध्ये संगीत मैफिल

  CST
  षण्मुखानंदमध्ये संगीत मैफिल
  मुंबई  -  

  सीएसटी - पर्यावरण आणि शाश्वतता साजरी करण्यासाठी एसबीआय - पंचतत्व हा सांगितिक कार्यक्रम 16 मार्चला षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. एसबीआय - पंचतत्व या कार्यक्रमात आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्वांचा सांगितिक, सुरेल आविष्कार सादर करण्यात येणार आहे. दुर्गा जसराज यांच्या कल्पनेतून साकारलेल्या एसबीआय - पंचतत्वमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अॅनिमेशन अत्यंत कल्पकतेने वापरण्यात आले आहे. या भव्य सांगितिक कार्यक्रमात जगभरातील प्रसिद्ध कलाकार प्रथमच एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

  “शाश्वततेची संकल्पना ठळकपणे मांडण्याच्या उद्दिष्टाने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. त्यामुळे हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. त्या दृष्टीने पंचतत्वसारख्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेमध्ये आम्ही सहभागी झाल्याचा आनंद आहे. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांमध्ये अडीच लाखांहून अधिक कर्मचारी आणि ग्राहकांनाही यात सहभागी करून घेणार आहोत," असे बँक ऑफ इंडियाचे उप-व्यवस्थापकीय संचालक आणि भारताचे मुख्य अधिकारी करण सेकर यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.