Advertisement

१६ हजार मजुरांच्या पाठिशी भाईजान, 'अशी' केली आर्थिक मदत

बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान यानं सिने क्षेत्राशी निगडीत १६ हजार मजूरांना आर्थिक मदत केली आहे.

१६ हजार मजुरांच्या पाठिशी भाईजान, 'अशी' केली आर्थिक मदत
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह अनेकांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. अशातच बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरीव मालिकांचे चित्रीकरणही बंद करण्यात आलं आहे. याचा फटका पोटावर हात असणाऱ्या मालिका आणि चित्रिकरण सेटवर कामगारांना बसला आहे. यांच्या मदतीला अनेक बॉलिवूड स्टार पुढे आले आहेत. यात आता भाऊजाननं देखील पुढाकार घेतला आहे.

बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खान यानं या क्षेत्राशी निगडीत १६ हजार मजूरांना आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्या केलेल्या घोषणेनुसार मंगळवारपासून सलमान खाननं मजूरांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.

चित्रपट-मालिका क्षेत्राशी निगडित १६ हजार मजूरांच्या बँक खात्यामध्ये सलमान खानकडून प्रत्येकी ३००० रूपये जमा करण्याची सुरुवात केली आहे. अशाप्रकारे दोन दिवसांमध्ये म्हणजेच, मंगळवार, बुधवारपर्यंत या सर्व मजूरांच्या खात्यामध्ये ४ कोटी ८० लाख रूपये जमा करण्यात आले, अशी माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) अध्यक्ष अशोक दुबे यांनी दिली.

२१ दिवसांसाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १९ मार्च पासूनच बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहेत. अशातच चित्रपट, टीव्ही मालिका, जाहिराती आणि वेब सीरिजच्या शुटिंगशी निगडीत मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच इतर बॉलिवूड सेलिब्रिटींव्यतिरिक्त सलमान खाननेही या मजूरांना मदत करण्याचा निर्णय घेतला. नुकतीच अमिताभ बच्चन यांनी देखील मदतीचा हात दिला.



हेही वाचा

कोरोनाविरुद्ध लढ्यात बिग बींचं योगदान, 'अशी' केली मदत

बॉलिवूडमधल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा