अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात अटक वॉरंट

महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिअॅलिटी शोच्या दरम्यान प्राजक्ताचा एक ड्रेस दिग्दर्शकाने रिजेक्ट केल्याने वाद सुरु झाला. दुसरा ड्रेस घालण्यास राजी नसलेल्या प्राजक्ताचा फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिच्याशी वाद झाला.

SHARE

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यावर आता अटक वाॅरंट जारी करण्यात आलं आहे. कोर्टात सुनावणीसाठी हजर न राहिल्याने तिच्याविरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिला मारहाण केल्याचा आरोप प्राजक्तावर आहे. 

 प्राजक्ता माळीवर तिची फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने तिला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी जान्हवीने ५ एप्रिल रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला होता. त्यानंतर जान्हवीने ठाणे कोर्टात तक्रार केली होती. कोर्टाने प्राजक्ताला समन्स बजावत २६ जून रोजी कोर्टात सुनावणीसाठी हजार राहण्याचे आदेश दिले होते. 

पोलीस तिच्या घरी समन्स घेऊन गेले होते. मात्र, घरी कोणीच नसल्याने समन्स परत आले. जून महिन्यात या प्रकरणी न्या. व्ही. व्ही. राव जडेजा यांच्या कोर्टात सुनावणी होती. मात्र प्राजक्ता गैरहजर राहिल्याने सुनावणी झाली नाही. त्यानंतर प्राजक्ता सुनावणीसाठी हजर न राहिल्याने तिच्यावर अटक वाॅरंट जारी करण्यात आलं आहे. 

 मिरारोड इथल्या मोनार्क स्टुडिओमध्ये ५ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्राची हास्यजत्रा या रिअॅलिटी शोच्या दरम्यान प्राजक्ताचा एक ड्रेस दिग्दर्शकाने रिजेक्ट केल्याने वाद सुरु झाला. दुसरा ड्रेस घालण्यास राजी नसलेल्या प्राजक्ताचा फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिच्याशी वाद झाला. व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून प्राजक्ताने आपल्याला मारहाण केली असा आरोप जान्हवीने केला आहे. 

या प्रकरणाशी संबंधित प्राजक्ता आणि जान्हवी यांच्या संभाषणाचा व्हॉट्स अ‍ॅप स्क्रीनशॉटही वायरल झाला होता. यामध्ये या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवणार असल्याचं जान्हवी म्हणत आहे. तर प्राजक्ता माळीने माझे वडील पोलीस असून माझे काका वकील असल्याने मला फरक पडत नसल्याचं इशारा तिने व्हॉट्स अ‍ॅप मेसेजला दिलेल्या प्रतिउत्तरातून दिसत आहे. 
संबंधित विषय
ताज्या बातम्या