19 मार्चला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार वितरण सोहळा

  Mumbai
  19 मार्चला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार वितरण सोहळा
  मुंबई  -  

  मुंबई - चतुरस्त्र कलाकार दिवंगत दादा कोंडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दादा कोंडके स्मृती पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा १९ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. परळच्या दामोदर हॉलमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे.

  दादा कोंडके यांच्या नावाने त्यांचे भाचे पद्माकर मोरे आणि भाची सुनबाई माणिकताई मोरे ह्या दाम्पत्याने दादांच्या कामाक्षी फिल्म डिस्ट्रीब्युटर्सच्या माध्यमातून दादांचा चित्रपटांचा ठेवा जीवापाड सांभाळला. मोरे दाम्पत्याने पहिली 9 वर्षे दादांच्या स्मृती प्रित्यर्थ शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्काराचे आयोजन केले.  त्या नंतरच्या काळात 8 वर्षे काही कारणास्तव हा पुरस्कार वितरण सोहळा मोरे कुटुंबियांना करणे जमले नव्हते. 2016 पासून पुन्हा मोरे कुटुंबीय आणि मुक्ता कम्युनिकेशन्स यांनी एकत्र येऊन हा पुरस्कार सोहळा सुरू केला. गेल्या वर्षी 2016 ला हा पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना लेण्याद्री जुन्नर या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता.

  यंदा परळ येथे १९ मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास प्रकाशित क्षितिजा थिएटर आणि नमन नटवरा मुंबई निर्मित सोंगाड्या या संकल्पनेचा 50 वा प्रयोग सादर होणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.