यंदाचं जागतिक मराठी संमेलन दादरमध्ये

 Dadar
यंदाचं जागतिक मराठी संमेलन दादरमध्ये
Dadar , Mumbai  -  

दादर - शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाचं यंदा 14वं वर्ष आहे. जागतिक मराठी अकादमी आणि छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट यांच्या वतीनं 7 आणि 8 जानेवारी 2017 रोजी हे संमेलन होणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात हे संमेलन होणार असून उद्घाटन जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होईल. या समारंभात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि जयंत सावरकर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संमेलनात भारतातील कर्तृत्ववान मराठी जनांच्या मुलाखतीही आयोजित करण्यात आल्या आहेत. हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य असून काही परदेशस्थही यात सहभागी होणार आहेत.

Loading Comments