आमिरवर रामू फिदा

Pali Hill
आमिरवर रामू फिदा
आमिरवर रामू फिदा
See all
मुंबई  -  

मुंबई - गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या बहुचर्चित सिनेमाचं प्रेक्षकांबरोबर सर्व कलाकारांनीही तोंड भरून कौतुक केलं. पण आता कौतुक करणाऱ्यांच्या यादीत आणखी एक अनपेक्षित नावही आलंय. ते नाव आहे रामगोपाल वर्मांचं. 20 वर्षांपूर्वी रंगीला सिनेमाच्या वेळी या दोघांत वाद रंगल्याची बरीच चर्चा रंगली झाली. पण आता आमिरच्या दंगल सिनेमाचं रामगोपाल वर्मानं अगदी तोंड भरून कौतुक केलंय. नुकताच रामूनं आमिरचा दंगल सिनेमा पाहिला आणि त्याला तो इतका आवडला की सिनेमाचं कौतुक करणारी ट्विट त्यानं केलीत. मी दंगल पाहिला आणि भारावून गेलो, मी एका गोष्टीची दाद देतो की, भारतीय प्रेक्षकांना काय आवडू शकत शकतं हे आमिरने बरोबर हेरलं आहे. मला आमिरच्या पाया पडावंसं वाटतंय. त्याच्यात प्रामाणिकपणा नेहमीच होता आणि तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय अशा आशयाची ही ट्विट आहेत. रामगोपाल वर्माचं प्रेम अचानक निर्माण झालंय की, त्यामागे काही वेगळं कारण आहे, हे वेळच सांगेल. पण दंगलच्या निमित्तानं का होईना दोघांमधील दंगल वीसेक वर्षांनंतर संपली, हे मात्र नक्की.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.