दंगल मुकणार 400 चा टप्पा

  Mumbai
  दंगल मुकणार 400 चा टप्पा
  मुंबई  -  

  मुंबई - दंगल चित्रपटाची गेल्या 20 दिवसांमधील कामगिरी अगदी स्वप्नवत म्हणावी लागेल. प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांमध्ये हंड्रेड करोड क्लबमध्ये दाखल झालेला हा चित्रपट गेल्या तीन आठवड्यांपासून सुसाट कामगिरी करीत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमधील आजवरचे व्यवसायाचे सर्व आकडे या चित्रपटाने आतापर्यंत मोडीत काढले आहेत. 100, 200 आणि 300 कोटींचा टप्पा पहिल्यांदा गाठण्याचे यापूर्वीचे सर्व विक्रम आमिरच्याच नावावर जमा आहेत. त्याच्या गजनी चित्रपटाने पहिल्यांदा 100 कोटींचा व्यवसाय केला होता. थ्री इडिएटसने प्रथम 200 कोटींचा पल्ला पार केला होता आणि 300 कोटींची नेत्रदीपक कामगिरी ‘पीके’नेच पहिल्यांदा केली होती. त्यामुळेच दंगल आता 400 कोटींमध्ये जाईल, अशी आशा आमिरच्या चाहत्यांना होती. मात्र या आठवड्यात ओके जानू हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे दंगलच्या शोमध्ये मोठी घट होणार आहे. तसेच 24 जानेवारीला शाहरूख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबील एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे चांगली कामगिरी होत असूनही नवीन चित्रपटांसाठी दंगलला चित्रपटगृहे रिकामी करावी लागणार आहेत. वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या उत्पन्नाचा अंतिम आकडा 380 ते 390 कोटींच्या घरात राहण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.