Advertisement

यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र

दीपिका आणि रणबीर दोघेही प्रोफेशनल अॅक्टर्स आहेत. त्यामुळं एकमेकांसोबत पुन: पुन्हा आॅनस्क्रीन जोडी जमवायला त्यांना काहीच हरकत नाही.

यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र
SHARES

आज जरी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ही रील लाईफ जोडी रीअल लाईफमध्ये एकरूप झाली नसली तरी रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण या जोडीनंही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आता ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.


२०१३ पासून एकत्र नाही

दिग्दर्शक इम्तियाज अलीचा 'तमाशा', सिद्धार्थ आनंदचा 'बचना ऐ हसीनों' आणि अयान मुखर्जीच्या 'ये जवानी है दीवानी' या सिनेमांमधील रणबीर-दीपिका ही जोडी २०१३ पासून एकत्र दिसलेली नाही. अशातच दीपिकानं रणवीरसोबत लग्न केल्यानं रणबीरसोबत ती दिसणार का? यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दीपिकानं मात्र या सर्वांना प्रत्युत्तर देत पुन्हा रणबीरसोबत जोडी जमवली आहे. दीपिका आणि रणबीर दोघेही प्रोफेशनल अॅक्टर्स आहेत. त्यामुळं एकमेकांसोबत पुन: पुन्हा आॅनस्क्रीन जोडी जमवायला त्यांना काहीच हरकत नाही.


जाहिरातीसाठी एकत्र

रणबीर-दीपिका आता कोणत्याही सिनेमासाठी नव्हे, तर एका जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. दीपिका आणि रणबीर एशियन पेंट्सच्या रोयाल हेल्थ शिल्ड या नव्या ब्रँडच्या जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. प्रत्येक घरासाठी अँटी बॅक्टेरिअल पेंट म्हणून रोयाल हेल्थ शिल्डचा पर्याय देण्यासाठी ही नवी जाहिरात तयार करण्यात आली आहे. दीपिका आणि रणबीर या दोघांमधील मैत्रीपूर्ण हलकीफुलकी गंमत आणि बंध या जाहिरातीत अधोरेखित करण्यात आले आहेत. हे दोन सेलिब्रिटी या जाहिरातीत एशियन पेंट्सच्या रोयाल हेल्थ शिल्डमुळे मिळणाऱ्या आरोग्यपूर्ण आणि हायजिनिक घरांचं महत्त्व पटवून देणार आहेत.


दीपिकाचं मार्गदर्शन

रोयाल हेल्थ शिल्डच्या या नव्या जाहिरातीत रणबीर त्याच्या घराचं नुतनीकरण करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, भिंतीला नेमका कोणता रंग द्यावा, यात त्याचा गोंधळ उडाला आहे. स्टाईल आणि डिझाइनची अप्रतिम निवड व समजासाठी ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाला तो मार्गदर्शनासाठी बोलावतो. त्याला हवा तो रंग निवडण्याचा सल्ला दीपिका देते. मात्र, त्याच्या आरोग्याची काळजी घेईल, असाच रंग हवा. भिंतींना आकर्षक रूप देण्यासोबतच जीवाणूंना दूर ठेवत घराच्या भिंतींना सर्वोच्च सुरक्षा देणाऱ्या एशियन पेंट्सच्या रोयाल हेल्थ शिल्ड रंगांची शिफारस ती यात करते. कारण काहीही असो, पण या जाहिरातीच्या निमित्तानं आपल्या आवडत्या दोन कलाकारांना पुन्हा एकत्र पाहण्याची सध्या रणबीर-दीपिकाच्या चाहत्यांना लाभणार आहे.हेही वाचा - 

आपण यांना ओळखलंत का?

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...
संबंधित विषय
Advertisement