Advertisement

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...

'सैराट' सिनेमाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल झाल्यावर एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू परतली आहे. 'कागर' या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या रिंकूचा हा नवा लुक पहा...

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...
SHARES

'सैराट' सिनेमाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल झाल्यावर एका रात्रीत स्टार बनलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू परतली आहे. 'कागर' या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या रिंकूचा हा नवा लुक पहा...


नव्या रूपात

मागील काही दिवसांपासून बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासात व्यग्र असलेली रिंकू आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता दिग्दर्शक मकरंद मानेच्या 'कागर' या आगामी सिनेमात रिंकूनं मुख्य भूमिका साकारली आहे. 'रिंगण' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्यानंतर 'यंग्राड' बनवणाऱ्या मकरंदच्या 'कागर'ला रिंकूमुळं खूप महत्त्व प्राप्त झालं आहे.


प्रमोशनला सुरुवात

बारावीचं टेन्शन दूर झाल्यानं रिंकू आता 'कागर'च्या प्रमोशनसाठी वेळ देणार आहे. रिंकूच्या परीक्षेनंतर 'कागर'साठी जोर लावणार असल्याचं यापूर्वीच मकरंदनं 'मुंबई लाइव्ह'शी बातचित करताना सांगितलं होतं. त्यानुसार आता खऱ्या अर्थानं 'कागर'च्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे. या सिनेमातील रिंकूचा लुक दर्शवणारं पोस्टर नुकतंच वायोकॅाम १८ च्या वतीनं रिव्हील करण्यात आलं आहे.


पोस्टर प्रदर्शित

'तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार 'कागर' अशा आशयाच्या ओळींसह या सिनेमाचं पहिलं अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'पुन्हा एकदा मानाने झळकायला, 'ती' येतेय तुमची मनं जिंकायला!', ही पोस्टरवरील ओळ रिंकूच्या चाहत्यांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी पूरक आहे. वायोकॅाम १८ मोशन पिक्चर्सची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती उदाहरणार्थच्या बॅनरखाली करण्यात आली आहे.


राजकारणावर भाष्य

या सिनेमातील इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. प्रदर्शनाच्या तारखेची घोषणाही करण्यात आलेली नाही, पण सिनेमाच्या पोस्टरवरील रिंकूचा अंदाज बरंच काही सांगून जातो. आज सगळीकडं निवडणूकीचे वारे वाहत आहेत. या सिनेमाच्या पोस्टरवरही तसंच काहीसं वातावरण पाहायला मिळतं. एखाद्या राजकारण्यासारखा रिंकूचा लुक या सिनेमाचं कथानक राजकारणावर भाष्य करणारं असण्याचे संकेत देतो. आजूबाजूला लागलेले रिंकूचे पोस्टर्स, प्रचंड गर्दी आणि हवेत उधळलेला गुलाल जणू काही ही रिंकूची विजय यात्राच असल्याचं भासवतो. या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार आहे ते मात्र अद्याप सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळं प्रेक्षकांना मात्र यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.



हेही वाचा -

पाण्याला सिनेमांची लागली तहान!

जूनमध्ये फुलणार स्वप्नीलचा 'मोगरा...'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा