Advertisement

आपण यांना ओळखलंत का?

आजवर पटकथा लेखन करणाऱ्या तुषार हिरानंदानीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमाचं शीर्षक आहे ‘सांड की आँख’. ओळखा पाहू कोण आहेत या सिनेमातील या नायिका…

आपण यांना ओळखलंत का?
SHARES

हे फोटोज आहेत निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या होम प्राॅडक्शनमध्ये बनणाऱ्या आगामी हिंदी सिनेमातील. आजवर पटकथा लेखन करणाऱ्या तुषार हिरानंदानीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या सिनेमाचं शीर्षक आहे ‘सांड की आँख’. ओळखा पाहू कोण आहेत या सिनेमातील या नायिका…


लुक रिव्हिल

‘सांड की आँख’ या सिनेमाचं चित्रीकरण सध्या उत्तर प्रदेशमधील जोहरी या गावी सुरू आहे. या सिनेमात अशा दोन स्त्रियांची कहाणी पाहायला मिळणार आहे ज्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेत आकाशाला गवसणी घातली आहे. पिस्तुल आणि रायफल शूटिंगमधील जगातील सर्वात जुन्या शार्पशूटर असलेल्या चंद्रो तोमर आणि प्राक्षी तोमर यांची कथा ‘सांड की आँख’ या सिनेमात आहे. या सिनेमातील आॅनस्क्रीन चंद्रो आणि प्राक्षी यांचा लुक नुकताच रिव्हिल करण्यात आला आहे, पण त्यांचे चेहरे मात्र दाखवण्यात आलेले नाहीत.


दोघी कोण?

त्यामुळं हे कोडं प्रेक्षकांनाच सोडवावं लागणार आहे. या दोन्ही अभिनेत्रींना अशा प्रकारे गेटअप करण्यात आला आहे की कितीही ओळखण्याचा प्रयत्न केला तरी त्या ओळखता येत नाहीत. यातील एका फोटोत दोघीही भिंतीवर गाई-म्हैशींच्या शेणाच्या गोवऱ्या थापताना दिसतात. दुसऱ्या फोटोत त्यांच्या एका हातात पिस्तुल आहे, तर दुसऱ्या हाताने त्या प्रेमाचं निशाण असलेल्या बदामाचा आकार तयार करत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये दोघी ट्रॅक्टर चालवताना दिसतात. या तिन्ही फोटोंमधून दोघींच्या आयुष्यात घडणारे बदल दाखवण्यात आले असले तरी त्या पाठमोऱ्या असल्यानं या दोघी कोण आहेत हे मात्र समजत नाही.


वास्तववादी भूमिकांना प्राधान्य

या दोन्ही अभिनेत्रींनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. केवळ ग्लॅमरस भूमिकांच्या मागे न धावता वास्तववादी भूमिकांना प्राधान्य देत समाजातील ज्वलंत विषय हाताळणाऱ्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. या दोन अभिनेत्रींपैकी एकीचा ‘बदला’ हा सिनेमा सध्या बाॅक्स आफिसवर गाजतोय, तर दुसरीचा ‘सोनचिडीया’ त्या पूर्वीच्या आठवडयात प्रदर्शित झाला आहे. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर या दोघी जणी ‘सांड की आँख’मध्ये चंद्रो आणि प्राक्षी यांच्या भूमिका साकारत आहेत. त्यांच्या जोडीला या सिनेमात बरेच चरीत्र कलाकार दिसणार आहेत. यात निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा पुन्हा एकदा वेगळ्या रूपात दिसतील. याखेरीज ‘मुक्काबाज’ फेम विनीत कुमारचीही यात भूमिका आहे.हेही वाचा -

शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा- अनिल बोरनारे

पाण्याला सिनेमांची लागली तहान!संबंधित विषय
Advertisement