Advertisement

'पद्मावती'चं पहिलं गाणं लाँच; दीपिकाच्या घुमर डान्सला चाहत्यांची पसंती!

'पद्मावती'चं पहिलं गाणं लाँच होताच त्याला नेटिझन्स, सोशल वेडे आणि दीपिकाच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं नसतं तरच नवल! सिनेमाचं पहिलं गाणं 'घूमर' लाँच झालं आणि युट्यूबवर त्याला लाखोंनी हिट्स मिळू लागले.

'पद्मावती'चं पहिलं गाणं लाँच; दीपिकाच्या घुमर डान्सला चाहत्यांची पसंती!
SHARES

'पद्मावती'..संजय लीला भन्साळींच्या प्रत्येत सिनेमाप्रमाणेच 'पद्मावती' सिनेमाबद्दलही जबरदस्त चर्चा, गॉसिप सध्या सगळीकडेच सुरु आहे. मग ते राणी पद्मावतीच्या भूमिकेत असलेल्या दीपिका पदुकोणचा 35 किलोंचा ड्रेस असो, अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत असलेल्या रणवीर सिंगचा जबरदस्त लुक असो किंवा मग आपल्या स्वभावाच्या आणि छबीच्या विरूद्ध जाऊन शाहीद कपूरने साकारलेला करारी राजपूत असो. 'पद्मावती' सिनेमा अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. शिवाय सिनेमातल्या काही दृश्यांमुळे तो काहीसा वादातही आहे. पण वादामुळे असो, स्टारकास्टमुळे असो किंवा मग कथानकामुळे असो...निगेटिव्ह ऑर पॉजिटिव्ह, पब्लिसिटी इज पब्लिसिटी! मग 'पद्मावती'ही त्याला अपवाद नाही!

आता इतकी चर्चा झालेल्या 'पद्मावती'चं पहिलं गाणं लाँच होताच त्याला नेटिझन्स, सोशल वेडे आणि दीपिकाच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतलं नसतं तरच नवल! सिनेमाचं पहिलं गाणं 'घूमर' लाँच झालं आणि युट्यूबवर त्याला लाखोंनी हिट्स मिळू लागले.



देशभरातली एकमेव घुमर अकॅडेमी असलेल्या संस्थेच्या सहाय्यक संचालिका ज्योती तोमर यांच्याकडून दीपिकाने घुमर डान्सचे धडे गिरवले आहेत. तर कृती महेश मिद्या यांनी हा डान्स कोरिओग्राफ केला आहे. श्रेया घोषाल यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

येत्या 1 डिसेंबरला 'पद्मावती' देशभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे!



हेही वाचा

'पद्मावती'साठी वापरलं 400 किलो सोनं!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा