ढिंच्याक् पूजाचं ढिंच्याक् 'कमबॅक'!

Mumbai
ढिंच्याक् पूजाचं ढिंच्याक् 'कमबॅक'!
ढिंच्याक् पूजाचं ढिंच्याक् 'कमबॅक'!
ढिंच्याक् पूजाचं ढिंच्याक् 'कमबॅक'!
See all
मुंबई  -  

सेल्फी मैने ले ली आज, सेल्फी मैने ले ली आज, सर पे मेरे रेहेता ताज, सेल्फी मैने ले ली आज...

स्वॅग वाली टोपी, मेरी स्वॅग वाली टोपी...

दिलो का शूटर, है मेरा स्कूटर, दिलो का शूटर...

ढिंच्याक पूजाची ही गाणी नक्कीच सर्वांना लक्षात असतील. या गाण्यांच्या आधारे 'ढिंच्याक पूजा'ने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा पूजा तिच्या चाहत्यांसाठी एक 'ढिंच्याक' गाणं घेऊन आली आहे.
ढिंच्याक पूजाच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच चांगली बातमी आहे. पण तिची गाणी ज्यांच्या डोक्यात जातात, त्यांच्यासाठी मात्र याहून दु:खद बातमी नसेल. ढिंच्याक पूजाने तिच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर हे गाणे शेअर केले आहे. शेअर केल्यानंतर काही तासांमध्येच या व्हीडिओला तीन हजाराहून अधिक लाईक्स आणि ५൦൦ हून अधिक शेअर मिळाले आहेत.दोन दिवसांपूर्वी ढिंच्याक पूजाने तिच्या अधिकृत फेसबुक अकांऊटवर एक पोस्ट शेअर केली होती. लवकरच नवीन व्हीडिओ घेऊन येणार असल्याचे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानुसार तिने युट्यूबवर तिचा नवीन व्हीडिओ अपलोड केला आहे.ढिंच्याक पूजाचे १२ व्हीडिओ युट्यूबवरून का हटवले होते?

गंमत म्हणजे दोनच आठवड्यांपूर्वी ढिंच्याक पूजाच्या युट्यूब चॅनलवरून तिचे १२ व्हीडिओ काढून टाकण्यात आले होते. कथप्पा सिंह याच्या विनंतीवरून हे व्हीडिओ युट्यूबवरून हटवण्यात आले होते. युट्यूबच्या पॉलिसीनुसार, तुमची परवानगी नसेल आणि तुम्ही त्या व्हीडिओमध्ये दिसत असाल, तर तो व्हीडिओ काढून टाकण्याची विनंती तुम्हाला करता येऊ शकते. तसेच, जर कॉपीराईट्सचे उल्लंघन झाले तरीही व्हीडिओ हटवण्यात येऊ शकतो.

ढिंच्याक पूजाच्या आत्मविश्वासाची खरच दाद द्याला हवी. एवढे सर्व होऊनही निराश न होता तिने 'ढिंच्याक' पद्धतीनेच कमबॅक केले आहे!
डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.