धोनीच्या नावावर नवा विक्रम

 Pali Hill
धोनीच्या नावावर नवा विक्रम

मुंबई - टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा बायोपिक ‘धोनी दी अनटोल्ड स्टोरी‘ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 21.30 कोटींची कमाई केलीय. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारलीय.

प्रदर्शनाच्या दिवशी एवढी मोठी ओपनिंग घेणारा या वर्षातील हा दुसरा सिनेमा ठरला आहे. या वर्षात केवळ ‘सुलतान‘ चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली होती. सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता धोनी चित्रपटाने रेकॉर्ड केला आहे.

Loading Comments