• दिल मराठी, धडकन मराठी !
SHARE

मुंबई - एकापेक्षा एक हटके मालिका प्रेक्षकांसमोर आणणारी आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान मिळवणारी वाहिनी म्हणजे अर्थात 'झी मराठी'. या वाहिनीचा लोकप्रिय अवॉर्ड सोहळा 'झी मराठी अवॉर्ड्स 2016' नुकताच मुंबईत पार पडला. सर्व मालिकेतील प्रमुख नायक नायिकेच्या जोड्यांचे बहारदार नृत्यही सोहळ्यात पार पडले. 'चला हवा येऊ द्या' मंडळींचे हास्यस्फोट पाहून तर तुमचे आणखीनच मनोरंजन होईल. 

या सोहळ्यात 'काहे दिया परदेस' या मालिकेने चक्क 11 ऑवॉर्ड जिंकून आपला वेगळा ठसा उमटवला. आगळ्या वेगळ्या शैलीत सांगणारा हा सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता झी मराठीवरुन प्रसारित होणाराय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या