मुलुंडकरांसाठी दिवाळी पहाट

 Pali Hill
मुलुंडकरांसाठी दिवाळी पहाट
मुलुंडकरांसाठी दिवाळी पहाट
मुलुंडकरांसाठी दिवाळी पहाट
मुलुंडकरांसाठी दिवाळी पहाट
मुलुंडकरांसाठी दिवाळी पहाट
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुलुंड - नरकचतुर्दशीच्या निमित्तानं जिमखान्यात शनिवारी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मराठी भावगीतं या कार्यक्रमात सादर झाली. या कार्यक्रमामध्ये दिग्गज गायकांनी हजेरी लावली होती. रवींद्र साठे, उत्तरा केळकर, श्रीकांत नारायण, सोनाली कर्णिक, चिंतामणी सोहोनी, कविता निकम यांच्या स्वरमयी आवाजानं मुलुंडकरांची दिवाळी पहाट चांगलीच रंगली. अभिनेता तुषार दळवी आणि अभिनेत्री संपदा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं.

या कार्यक्रमासाठी मुलुंडकर पारंपरिक वेशात मोठ्या उत्साहात हजर होते. तसंच भाजपाचे खासदार किरीट सोमय्याही अनेक पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते.

Loading Comments