Advertisement

'सावरकर स्मारक' चित्रकला स्पर्धा


'सावरकर स्मारक' चित्रकला स्पर्धा
SHARES

दादर - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 51 व्या आत्मार्पण स्मृतिवर्षाचं औचित्य साधत दादरमध्ये रविवारी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ही चित्रकला स्पर्धा झाली. या स्पर्धेला विविध ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उद्घाटन स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले. यावेळी स्पर्धाप्रमुख विज्ञानेश मासावकर, स्पर्धा मार्गदर्शक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस, विनित मासावकर आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. महापौर स्नेहल आंबेकर यांनीही यावेळी भेट दिली. तसेच प्रसिद्ध संतूरवादक सतीश व्यास देखील यावेळी उपस्थित होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा