Advertisement

ड्रग्ज तस्करीसाठी सेलिब्रेटींंच्या नावाचा वापर


ड्रग्ज तस्करीसाठी सेलिब्रेटींंच्या नावाचा वापर
SHARES

मुंबई - ड्रग्ज तस्करीसाठी बॉलिवूड हिरो-हिरॉईनच्या नावाचा कोडवर्ड वापरला जात असल्याची माहिती क्राइम ब्रांचच्या एका फोन टॅपिं द्वारे समोर आली आहे. ड्रग्ज तस्करीसाठी अभिनेत्री आलिया, कंगना आणि प्रियंका चोपडा यांच्या नावाचा कोडवर्ड म्हणून वापर केला जातो. क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्याने फोन टॅपद्वारे हा खुलासा केला आहे. सुलतान सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या सिनेमाचे नाव देखील तस्करीसाठी वापरले जात असल्याचे उघड झाले आहे. ‘सुल्तान आज लेट है’! अशा आशयाचे संभाषण या टॅपिंगमध्ये कैद झाले. सुरुवातीला सुलतान सिनेमाबद्दल बोललं जात असल्याचे अधिकाऱ्यांना वाटले. मात्र अधिक तपास केला असता ड्रग्ज तस्कर याचा कोडवर्डसाठी वापर करत असल्याचे उघड झाले.

ड्रग्ज तस्करीसाठीचे कोडवर्ड

रणवीर सिंग - पेडलर
रणबीर कपूर - होस्ट
आलिया भट्ट - कोकेन
कंगाना रणौत - अफिम
कतरिना कैफ - स्मैक
प्रियंका चोपडा - एलएसडी
अनुष्का शर्मा - हशिश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा