Advertisement

हिंदीतली 'सोना मोहपात्रा' करणार ज्ञानोबा माऊलींचा गजर!


हिंदीतली 'सोना मोहपात्रा' करणार ज्ञानोबा माऊलींचा गजर!
SHARES

‘टाटा सॉल्ट' 'कल का भारत है’ आणि ‘क्लोज अप पास आओ ना’ या प्रसिद्ध जिंगल्स, तसेच ‘दिल्लीबेल्ली', 'फुक्रे’, ‘हंटर’, ‘रामण राघव २.०’ या सारख्या अनेक हिंदी चित्रपटातील गीतांना आवाज देणाऱ्या गायिका सोना मोहपात्रा यांनी आगामी 'घाट' या मराठी सिनेमातील भक्तीमय गीत नुकतेच स्वरबद्ध केलं आहे. 

घुमला गजर आभाळी , ज्ञानराज माझी माऊली...

ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावली, ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली...

'माझ्या मनाला स्पर्शून गेलेलं हे भावगीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल,' असा विश्वास व्यक्त करताना मराठीत गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच चांगला राहिला असल्याचं ही सोना मोहपात्रा आवर्जून सांगतात. या गाण्याच्या निमित्ताने गायिका सोना मोहपात्रा यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना माऊलींचा हा गजर म्हणजे माऊलींची सेवाच असल्याचं संगीतकार रोहित नागभिडे सांगतात.



आयुष्याची अनाकलनीय आव्हाने आणि घटनांकडे किती वेगवेगळ्या बाजूने बघता येते, याचा वेध 'घाट' या चित्रपटातून घेण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा–पटकथा–संवाद राज गोरडे यांचे आहेत. एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा 'घाट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा