Advertisement

प्रशांत दामले का झाले भावूक?


प्रशांत दामले का झाले भावूक?
SHARES

सदैव हसतमुख, प्रसन्न, कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि कुशल अभिनयामुळे प्रशांत दामले यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. रंगभूमीवरील अनेक विक्रम प्रशांत यांच्या नावावर आहेत. महाराष्ट्राचे हेच लाडके अभिनेते कलर्स मराठीवरील 'तुमच्यासाठी काय पन' या कार्यक्रमातील 'गाजावाजा जंक्शन'वर नुकतेच येऊन गेले. यावेळी त्यांच्या चाहत्याने अनोखी भेट दिल्याने प्रशांत भावूक झाले.


'त्या' फॅनचं केलं कौतुक

प्रशांत दामले यांचे देशभरात लाखो फॅन्स आहेत. त्यांच्या प्रत्येक फॅनला त्यांना भेटायची संधी मिळतेच असं नाही. त्यापैकीच एक फॅन असलेल्या ऋषिकेश विचारे याला प्रशांत दामलेंना भेटण्याची संधी मिळाली. ऋषिकेश हा या कार्यक्रमामधील आर्ट डिरेक्शनच्या टीममध्ये आहे. तो प्रशांत दामले यांचा खूप मोठा फॅन आहे. त्याने प्रशांत दामले यांच्यासाठी अनोखी भेट तयार केली. ती भेट म्हणजे त्यांचा स्केच. हे अप्रतिम स्केच त्याने स्वत: काढलं आहे. त्याला हे स्केच काढायला तब्बल ७२ तासांचा कालावधी लागला. हे स्केच बघून प्रशांत दामले हरखून गेले. त्यांनी ऋषिकेशचं तोंडभरून कौतूकही केलं.

कलर्स मराठीवरील आज काय स्पेशल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सध्या प्रशांत दामले करत असून संशय कल्लोळ आणि साखर खाल्लेला माणूस ही त्यांची दोन्ही नाटकं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.


'तुमच्यासाठी काय पन'मध्ये यांचीही हजेरी

साखर खाल्लेला माणूस नाटकामधील शुभांगी गोखले, चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक) आदी उपस्थित होते. तर 'संशय कल्लोळ'मधील राहुल देशपांडे, उमा देसाई इत्यादी उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमाच्या भागाची सुरुवात प्रशांत दामलेंच्या गाण्याने झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा