Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

डॉक्टरांना राक्षस बोलणं भोवलं, कॉमेडियन सुनील पाल विरोधात तक्रार दाखल

देशातील ९० टक्के डॉक्टर्स गैरफायदा घेत आहेत असा आरोप प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल (Sunil Pal) यानं केला होता.

डॉक्टरांना राक्षस बोलणं भोवलं, कॉमेडियन सुनील पाल विरोधात तक्रार दाखल
SHARES

डॉक्टरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल (Sunil Pal) यांला चांगलंच भोवलं आहे. हे डॉक्टर्स देवदूत नाहीत राक्षस आहेत असं तो म्हणाला होता. (Sunil Pal for Defaming Doctors) या वादग्रस्त विधानामुळं आता त्याच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पण या सर्व प्रकारानंतर सुनील पालनं माफी मागितली आहे.    

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (coronavirus) रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरील ताणही वाढत चालला आहे. परिणामी रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, औषध, लसी यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. परंतु या प्रतिकूल परिस्थितीचा देशातील ९० टक्के डॉक्टर्स गैरफायदा घेत आहेत असा आरोप प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता सुनील पाल (Sunil Pal) यानं केला होता.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार असोसिएट ऑफ मेडिकल कंसल्टंटच्या अध्यक्षा सुष्मिता भटनागर यांनी अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. सुनील पाल डॉक्टरांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप त्यांनी केला आहे. सुनीलचा एक व्हिडीओ त्यांनी ४ मे रोजी पाहिला होता. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर सुनीलला कठोर शिक्षा करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी सुनीलनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओद्वारे त्यानं देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं होतं. शिवाय डॉक्टरांवर गंभीर आरोप देखील केले होते. तो म्हणाला होता, “देशातील 90 टक्के डॉक्टर्स चोर आहेत. दे कोरोनाग्रस्त परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. गरीबांनाकडून लाखो रुपये उकळत आहेत. साधं पाच रुपयांचं औषध १००  रुपयांना देखील विकत आहेत.”

मात्र त्याच्या या व्हिडीओवर काही नेटकरी संतापले. त्याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. शिवाय पोलीस तक्रारही करण्यात आली. त्यानंतर त्यानं हा व्हिडीओ डिलिट केला. संतापलेल्या नेटकऱ्यांची माफी मागितली. मात्र आपल्या विचारांवर तो ठाम आहे. तो म्हणाला “देशातील 10 टक्के डॉक्टर्स प्रामाणिकपणे काम करतायेत त्यामुळं देश कोरोना विरोधात लढतोय.”हेही वाचा

यश चोप्रा फाउंडेशनच्या वतीनं इंडस्ट्रीतील ३० हजार कर्मचाऱ्यांचं लसीकरण

'ही' अभिनेत्री चित्र विकून कोरोना रुग्णांसाठी जमवतेय निधी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा