Advertisement

KRK वर बलात्काराचा आरोप, मॉडेलनं केली पोलिसात तक्रार

केआरकेनं अनेक कलाकारांवर टीका केली. पण, आता त्याच्यावरच बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

KRK वर बलात्काराचा आरोप, मॉडेलनं केली पोलिसात तक्रार
SHARES

बॉलिवूडचा स्वयंघोषित समीक्षक कमाल आर खान अर्थात केआरके हा त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सोशल मीडियावर केआरके चित्रपट आणि कलाकारांबद्दल त्याचं मत मांडताना दिसतो.

केआरके गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांशी पंगा घेताना दिसत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी पंगा घेतल्यानंतर मिका सिंगनं त्याला ट्रोल केलं होतं. यानंतर केआरकेनं अनेक कलाकारांवर टीका केली. पण, आता त्याच्यावरच बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

ताशा नावाच्या एका महिलेनं केआरकेवर हा आरोप केला आहे. ताशा एक लोकप्रिय फिटनेस मॉडेल आहे. २६ जुन २०२१ रोजी मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये केआरके विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणात ताशानं अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसंच केआरकेनं देखील यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ताशा आपल्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तर, केआरके सध्या दुबईत असल्याचं म्हटलं जातंय. काही दिवसांपूर्वी मिका सिंगनं केआरकेसाठी एक गाणं रिलीज केलं होतं. या गाण्यात केआरके कुत्रा असल्याचं मिका सिंग म्हणाला होता. तर त्यानंतर केआरकेनं मिका विरोधात एक गाणं रिलीज केलं होतं.हेही वाचा

करण जोहर करणार बिग बॉस होस्ट, तर सलमान खान...

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना लाच दिली?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा