Advertisement

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना लाच दिली?

मुंबई पोलिसांच्या गुन्हे अनवेषण विभागानं राज यांच्याकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या आरोपांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेल आला आहे.

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना लाच दिली?
SHARES

उद्योगपती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अनवेषण विभागानं राज यांच्याकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या आरोपांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मेल आला आहे.

अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)ला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासोबत असलेला आरोपी यश ठाकूर याचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. या मेलमध्ये त्यांनी शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांनी अटक टाळण्यासाठी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना २५ लाखांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. पॉर्न फिल्म प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांनी दावा केला आहे की, पोलिसांनी राज कुंद्राला यापूर्वीच अटक केली असती.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडूनही लाच मागितली होती, असा दावा यश ठाकूर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी यावर्षी मार्च महिन्यात महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरोला ईमेल लिहून तक्रार केली होती. तसंच मला अटक होण्यापासून वाचवण्यासाठी माझ्याकडून २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एप्रिलमध्ये हे मेल मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवले होते आणि या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितलं होतं. यश ठाकूर यांच्याविरूद्ध पॉर्न फिल्म प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर मुंबई पोलिसांना बरेच महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. मात्र, पोलीस अद्याप तपास करत आहेत. मुंबई पोलिसांशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, राज कुंद्राच नव्हे तर इतरही अनेक लोक पोर्न इंडस्ट्रीत सहभागी होते. पोलिसांच्या चौकशीत अशी अनेक नावे समोर आली आहेत, ज्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही.

राज कुंद्रा आणि उमेश कामत हॉटशॉट नावाचा एक वेब सीरिज अॅप चालवत होते. यावर आतापर्यंत ९० व्हिडीओज शेअर करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ३० मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणावर अश्लील दृश्य आहेत.

हे पॉर्न व्हिडीओ नाहीत असा दावा वारंवार राज कुंद्रा करत आहे. चौकशीदरम्यान युकेमधील केनरिन कंपनीसोबत त्याचे व्यवसायिक संबंध असल्याचं त्याने मान्य केलं. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारच्या पॉर्न व्हिडीओंची निर्मिती केलेली नाही असं तो वारंवार सांगतोय. तो केवळ एरॉटिक बोल्ड सीरिजची निर्मिती करत होता असा त्याचा दावा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.हेही वाचा

राज कुंद्रा प्रकरणामुळे उमेश कामतला मनःस्ताप, फोटो वापरणाऱ्यांविरोधात करणार कारवाई

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा