Advertisement

करण जोहर करणार बिग बॉस होस्ट, तर सलमान खान...

करण जोहर वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचे पुढचे सीझन होस्ट करताना दिसणार आहे.

करण जोहर करणार बिग बॉस होस्ट, तर सलमान खान...
SHARES

बिग बॉस आणि सलमान खान हे समीकरण प्रेक्षकांच्या मनात फिक्स आहे. २०१० पासून सलमान खान बिग बॉस होस्ट करत आहे. पण आता तुम्हाला सांगितलं की, एक नावाजलेला दिग्दर्शक निर्माता बिग बॉस होस्ट करताना दिसणार आहे, तर...

अगदी बरोबर ऐकलंत तुम्ही. हो, हो... करण जोहर. पण तुम्हाला प्रश्न प़डला असेल की मग सलमान खान शो होस्ट करणार की नाही? सांगतो सांगतो... आता नवा ट्विस्ट जाणून घेण्यासाठी तुम्हाला बातमी पूर्ण वाचावी लागेल.  

निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं बॉलिवूड व्यतिरिक्त एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीतील इतर क्षेत्रातही यशस्वी पाऊल ठेवलं आहे. आतापर्यंत 'कॉफी विथ करण' हा टेलिव्हिजन टॉक शो आणि 'व्हॉट द लव्ह' हा डेटिंग शो त्याने होस्ट केला.

याशिवाय 'कॉलिंग करण' हा रेडिओ शो आणि 'झलक दिखला जा', 'इंडियाज गॉट टॅलेंट', 'इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स' सारख्या टीव्ही शोचे तो परीक्षण करताना दिसला आहे. आता या यादीत आणखी एका रिअ‍ॅलिटी शोचे नाव जोडलं गेलं आहे.

करण जोहर वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचे पुढचे सीझन होस्ट करताना दिसणार आहे. निर्माता एका छोट्या ट्विस्टमधून शो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. तो सलमान खानच्या जागीदिसणार आहे.

एवढंच नाही तर डिजिटल प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन निर्मात्यांनी टीव्हीऐवजी बिग बॉस या शोचा पुढील सीझन ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याचा निर्णयघेतला आहे. 'बिग बॉस ओटीटी' चे पहिले सहा एपिसोड ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जातील. हे सर्व एपिसोड विना एडिटिंगचे असतील.

बिग बॉस हाऊसमधील २४x७ घडणा-या घडामोडी प्रेक्षकांना पाहता येतील. दरम्यान, या ६ भागांचे होस्ट करण्यासाठी निर्मात्यांनी करण जोहरला साइन केलं आहे. ज्याप्रमाणे सलमान खान दर विकेण्डला स्पर्धकांशी बोलतो, एलिमिनेशन घोषित करतो,स्पर्धकांची कानउघडणी करतो, अगदी त्याप्रमाणे करणसुद्धा असंच काहीतरी करताना दिसणार आहे.

सुरुवातीचे सहा भाग अनकट असतील. त्यामुळे यावेळी प्रेक्षकांना स्पर्धकांच्या अशी अनेक व्यक्तिमत्त्वे पाहायला मिळतील जे बघून ते हैराण होतील. करणची हटके स्टाइल प्रेक्षकांना बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांच्या जवळ आणेल, अशी खात्री निर्मात्यांना आहे.

करणच्या एंट्रीनंतर सलमाननं या शोला अलविदा म्हटलं आहे का? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावला असेल. तर तसे नाहीये. सहा भागानंतर जेव्हा शो टीव्हीवर प्रसारित होईल, तेव्हा सलमान खानच या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

खरं तर सलमानलाच बिग बॉस ओटीटी होस्ट करण्याची ऑफर दिली होती. मात्र तो आपल्या इतर प्रोजेक्ट्समध्ये बिझी असल्यानं इकडे वेळ देऊ शकला नाही. 'बिग बॉस OTT'चा पहिला एपिसोड ८ ऑगस्टला प्रसारित होणार आहे.



हेही वाचा

राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना लाच दिली?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा