Advertisement

राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव

न्यायालयानं सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचं सांगत राज कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव
SHARES

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई जिल्हा न्यायालयानं २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण न्यायालयानं सुनावलेली पोलीस कोठडी ही कायदेशीर नसल्याचं सांगत राज कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे.

राज कुंद्रानं याचिकेमध्ये आपल्याला बेकायदेशीपणे पोलिसांनी ताब्यात ठेवल्याचं ‘बेंच अ‍ॅण्ड बार’नं दिलेल्या आपल्या वृत्तात म्हटलं आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे कारण देत कुंद्रानं कोठडीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, असं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

मुंबई जिल्हा न्यायालयानं राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज जिल्हा न्यायालयासमोर कुंद्रा आणि थोर्पे यांना मुंबई पोलिसांनी हजर केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

ऑनलाइन बेटींगमध्ये पॉर्नोग्राफीतून मिळवलेला पैसा वापरण्यात आल्याची शक्यता व्यक्त करत मुंबई पोलिसांनी अधिक तपासासाठी सात दिवसांची कोठडी द्यावी अशी विनती केली होती. न्यायालयानं त्यानुसार या दोघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पण आता या आदेशाला कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा दाखला देत आपल्याला अशाप्रकारे कायदा आणि नियमांचं पालन न करता पोलीस कोठडीत ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. कुंद्रानं कोरोनाचंही कारण या याचिकेमध्ये दिलं आहे.

भारताच्या सरन्यायाधिशांनी एका निकालादरम्यान तुरुंगामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असं निरिक्षण नोंदवलं होतं, त्याचा दाखला कुंद्रानं दिल्याचं ‘बेंच अ‍ॅण्ड बार’नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.हेही वाचा

राज कुंद्राच्या घरातून ७० पॉर्न व्हिडिओ जप्त

अटक टाळण्यासाठी राज कुंद्रानं गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना लाच दिली?

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा