बिग बी अमिताभ बच्चन यांनी 'सरकार ३'मध्ये चित्रित करण्यात आलेल्या गणपती आरतीला स्वत:चा आवाज दिला आहे. हे गाणं रोहन विनायकनं स्वरबद्ध केलं आहे. गाण्याचं शूटिंग मुंबईतल्या एका बीचवर झालं आहे. यामध्ये बाप्पाच्या विशाल मूर्तीच्या विसर्जनाची दृश्यं चित्रित करण्यात आली आहेत. यासंदर्भातला व्हीडिओ रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
Ganpati Aarti video from Sarkar 3 sung by Amitabh Bachchan https://t.co/OpU5ymD4fg">https://t.co/OpU5ymD4fg
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) https://twitter.com/RGVzoomin/status/859329779459178498">May 2, 2017
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या 'सरकार ३' या चित्रपटातही बीग बी सुभाष नागरे यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाचा पहिला भाग २൦൦५ मध्ये प्रदर्शित झाला होता. तर चित्रपटाचा दुसरा भाग २൦൦८ मध्ये प्रदर्शित झाला होता. यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चनही मुख्य भूमिकेत होते. या वेळी 'सरकार ३'च्या कास्टमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. पण अमिताभ बच्चन सुभाष नागरे यांच्या भूमिकेतच पाहायला मिळतील. तर रोनीत रॉय, जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी, अमित साध आणि यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यामी गौतम पहिल्यांदाच रफटफ भूमिका साकारताना दिसणार आहे.