Advertisement

'सिंधू'मध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू

वास्तवातील सणांचे पडसाद कायम मालिकांमध्ये उमटत असतात. मग गणेशोत्सवासारखा सर्वात मोठा उत्सव कसा बरं मागं राहील. त्यामुळं 'सिंधू' या मालिकेतही गणेशोत्सवाची तयारी करण्याची लगबग सुरू असल्याचं पहायला मिळणार आहे.

'सिंधू'मध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू
SHARES

वास्तवातील सणांचे पडसाद कायम मालिकांमध्ये उमटत असतात. मग गणेशोत्सवासारखा सर्वात मोठा उत्सव कसा बरं मागं राहील. त्यामुळं 'सिंधू' या मालिकेतही गणेशोत्सवाची तयारी करण्याची लगबग सुरू असल्याचं पहायला मिळणार आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. अर्थातच 'सिंधू - एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट' या मालिकेचा सेटही त्याला अपवाद नाही! विशेष म्हणजे यानिमित्त एकोणिसाव्या शतकात गणेशोत्सव कसा साजरा केला जायचा हे छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना बघायला मिळेल. इतकंच नाही तर गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या कथेत एक रंजक ट्विस्टही येणार आहे. त्यामुळं यंदाचा गणेशोत्सव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी काहीसा खास ठरणार आहे.

प्रत्येक घराघरामध्ये जशी गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे, तसंच काहीसं वातावरण 'सिंधू'च्या सेटवरही आहे. कथानकानुसार सिंधूचं अलीकडंच लग्न झल्यामुळं तिचा हा सासरी पहिला गणेशोत्सव असेल. यानिमित्त ती हरितालिकेच्या व्रताचीही तयारी करताना दिसत आहे. हरितालिकेचं हे व्रत आपल्या पतीसाठी केलं जात असल्यामुळं या व्रताचं अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या कुटुंबात सुख, शांती नांदावी यासाठी महिलांतर्फे भगवान शंकराकडे साकडं घातलं जातं. अगदी प्राचीन काळापासून सौभाग्यप्राप्तीसाठी आणि आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी अनेकजणी हे व्रत निर्जळी किंवा उपाशी राहून करतात. त्यामुळं चिमुकली सिंधूदेखील हे हरतालिकेचं व्रत करताना मालिकेत दिसेल.  

येत्या आठवड्यात, देवव्रतसह घरातले सगळे मोठे वाजतगाजत कसे घरी गणपती आणतात हे बघायला मिळेल. मालिकेच्या सुरुवातीपासून सिंधू आणि बाप्पा यांच्यात एक वेगळं नातं असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळं अर्थातच ही लहानगी त्याच्या आगमनासाठी उत्साही आहे. नववधू सिंधूच्या हातून रानडेंकडच्या बाप्पाला ओवाळण्यात येईल. वाड्यात बाप्पा, आरती, मोदक असे एकूणच मंगलमयी वातावरण असेल. गणपती बाप्पासारखेच देवव्रतलाही मोदक अतिप्रिय आहेत. त्याची भूमिका ही खादाड दाखवळल्यानं तो काय गंमत करतो हे बघण्यासारखं ठरेल. 

नैवेद्याचे मोदक लंपास करण्याचा देवव्रतचा मनसुबा, तर सिंधूची ते वाचवण्यासाठीची धडपड अशी बरीच धमालमस्ती येत्या आठवड्यात बघायला मिळेल. या सगळ्यात मात्र अशी एक घटना घडणार आहे ज्यामुळं सगळ्यांना धक्का बसेल. काही चुकीचे तर घडत नाही ना? आता कथानकात हा ट्विस्ट नेमका काय आहे हे पुढं प्रेक्षकांना पहायला मिळेल.



हेही वाचा  -

‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी

महेशचं देवेंद्रला 'दबंग' गिफ्ट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा