सांताक्रूझ - सांताक्रूझ पश्चिममध्ये आई आणि बाळासाठी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आलं आहे. अभिनेत्री जेनेलिया देशमुख हिच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आले. डॉ. प्रियांका भोईर यांनी हे आरोग्य केंद्र सुरू केले आहे. डॉ. प्रियांका भोईर या व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक आहेत. अनेक जण आपले विचार गर्भवती स्त्री समोर मांडतात, परंतु ते सर्वच योग्य असतात असे नाही. म्हणून आई आणि बाळ निरोगी राहावेत या उद्देशानं हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. तर भारतातले हे पहिले आरोग्य केंद्र आहे जे फक्त बाळ आणि आई साठी असल्याचं सांगितल.